आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Br Ambedkars House Rajgruha : The Government Will Not Tolerate Those Who Insult The Rajgriha, Orders The Police To Take Strict Action Chief Minister Uddhav Thackeray

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजगृह तोडफोड:राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही, पोलिसांना कडक कारवाईचे दिले आदेश - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘राजगृह’ आपल्या सर्वांसाठी आदराचे ठिकाण, शांतता राखावी, प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'राजगृह'वर मंगळवारी संध्याकाळी दोन अज्ञातांनी तोडफोड केली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नुकसान केले आहे. आरोपींची तातडीने शोध घेऊन अटक करण्यात यावी अशी मागमी सर्व स्तरातून होत आहे. दरम्यान राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोपींविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, 'राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजीना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तुत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलिसांना दिले आहेत.' असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांन संताप व्यक्त केला आहे.

‘राजगृह’ आपल्या सर्वांसाठी आदराचे ठिकाण, शांतता राखावी

 दरम्यान, “राज्यातील सर्व आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी. ‘राजगृह’ आपल्या सर्वांसाठी आदराचे ठिकाण आहे. माझे आपल्या सर्वांना आवाहन आहे की, आपण शांतता राखावी” असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

पोलिसांनी तत्परतेने तपास सुरु केला असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.

राजगृहाचे ऐतिहासिक महत्त्व

मुंबईतील दादर भागात असलेले राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे स्थान आहे. जगभरातील आंबेडकर अनुयायी इथे दररोज भेटीला येत असतात. 

बातम्या आणखी आहेत...