आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बच्चन कुटुंबात कोरोना:अमिताभ-अभिषेक यांना कोरोनाचा संसर्ग, दोघेही रुग्णालयात दाखल; जया-ऐश्वर्या निगेटिव्ह

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कृपया मला गेल्या 10 दिवसांत भेटलेल्यांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी -बच्चन

महानायक अमिताभ बच्चन व त्यांचे पुत्र अभिषेक बच्चन यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दोघांना शनिवारी रात्री मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ७७ वर्षीय अमिताभ यांनी रात्री १०.५२ वाजता ट्विट करून ही माहिती दिली. अमिताभ हे कोरोनाविरुद्धच्या लढ्यात भारत सरकारचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. त्यांना लागण झाल्यानंतर कुटुंबीय व कर्मचाऱ्यांच्याही चाचण्या घेण्यात आल्या. जया बच्चन, एेश्वर्या व आराध्या यांचे अहवाल निगेटिव्ह आले. अमिताभ आणि अभिषेक यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. त्यांना किंचितसा ताप व खाेकला आहे. दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाने सांगितले. अमिताभ म्हणाले, ‘मी काेराेना पॉझिटिव्ह आहे. रुग्णालयात दाखल झालो आहे. १० दिवसांत जे कुणी माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी चाचण्या करून घ्याव्यात ही विनंती.’

8 जुलै रोजी आपल्या आवाजात कवितेच्या ओळी शेअर केल्या होत्या

गुजर जाएगा, गुजर जाएगा,

मुश्किल बहुत है, मगर वक्त ही तो है

गुजर जाएगा, गुजर जाएगा

जिंदा रहने का ये जो जज्बा है, फिर उभर आएगा

माना मौत चेहरा बदलकर आई है,

माना रात काली है, भयावह है, गहराई है

मगर यकीन रख, मगर यकीन रख

ये बस लम्हा है दो पल में बिखर जाएगा

जिंदा रहने का ये जो जज्बा है, फिर असर लाएगा।

डॉक्टर-नर्स ईश्वराचे रूप, मी नतमस्तक

रात्री १.०२ वाजता अमिताभ यांनी एक व्हिडिओ जारी केला. त्यात ते म्हणतात, ‘मी नानावटी रुग्णालयाचे डाॅक्टर, नर्स, मेडिकल स्टाफला सांगू इच्छितो की ते या अत्यंत निराशाजनक वातावरणात खूप चांगले काम करत आहेत. मी सुरतेत एका फलकावर वाचले होते, तुम्हाला माहीत आहे मंदिरे का बंद आहेत? कारण देव पांढरा काेट घालून रुग्णालयात आहेत. तुम्ही सर्व ईश्वराचे रूप आहात. मी नतमस्तक आहे.’

8 जुलै रोजीच दुसरे ट्विट...

मजबूत व्हा! खबरदारी घ्या! सर्व ठीक होईल!

तू न झुकेगा कभी, तू न थमेगा कभी

कर शपथ, कर शपथ, कर शपथ...!

यापूर्वीही गंभीर आजारांना हरवून परतले आहेत बच्चन

- मायेस्थेनिया ग्रेव्हिस : हा दुर्मिळ न्यूराेमस्क्युलर आजार आहे. यामुळे स्नायू कमकुवत होतात.

- १९८२ मध्ये ‘कुली’चे शूटिंग सुरू असताना जबर मार बसला. तेव्हा ते मृत्यूच्या जबड्यातून परतले हाेते.

- २००० मध्ये टीबी झाला होता. {२००५ मध्ये छाेट्या व मोठ्या आतड्यांवर शस्त्रक्रिया झाली. {हिपॅटायटिस-बी झाल्यामुळे यकृताचा ७५% भाग गमावल्याचे ते २०१५ मध्ये म्हणाले होते.

अभिषेक डबिंगसाठी गेला होता

गेल्या काही दिवसांपासून अमिताभ घराबाहेर पडलेले नाहीत. तीन दिवसांपूर्वी अभिषेक एका डबिंग स्टुडिअोत गेला होता त्या वेळी अनेक लोकांना भेटला.

- दुसरीकडे, अभिनेत्री रेखाच्या वांद्र्यातील बंगल्याचा सुरक्षा रक्षक पाॅझिटिव्ह आढळला आहे . निर्जंतुकीकरणासाठी बंगला सील करण्यात आला आहे.

रात्री १.०२ वाजता अमिताभ यांचा व्हिडिओ संदेश जारी...

‘मी काेराेना पाॅझिटिव्ह आलो आहे. रुग्णालयात शिफ्ट केले आहे. कुटुंबीय व स्टाफच्याही चाचण्या घेतलेल्या आहेत. त्यांच्या रिपाेर्टची प्रतीक्षा आहे.’

अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून दिली माहिती
अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून दिली माहिती

Get well soon my brother - @juniorbachchan - praying for the family’s well being and good health- love you man

सूत्रांच्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांच्यावर त्यांचे जवळिक असलेले डॉ अमोल जोशी आणि डॉ अविनाश अरोरा उपचार करत आहेत. डॉ अमोल जोशी गेल्या अनेक वर्षांपासून अमिताभ यांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...