आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मढ येथील पाच स्टुडिओ महापालिकेने हटवले:मढ परिसरातील अनधिकृत 5 फिल्म स्टुडिओ शुक्रवारी बृहन्मुंबई पालिकेने पाडून टाकले

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईच्या उत्तर पश्चिमेला समुद्रकिनारी मढ परिसरातील अनधिकृत ५ फिल्म स्टुडिओ शुक्रवारी बृहन्मुंबई पालिकेने पाडून टाकले. या स्टुडिओची किंमत १ हजार कोटी होती. हे स्टुडिओ बेकायदेशीर असल्याचा निर्णय राष्ट्रीय हरित लवादाने गुरुवारी दिला होता. पालिकेचे तत्कालीन कारभारी आदित्य ठाकरे आणि मुंबई शहराचे माजी पालकमंत्री व विद्यमान काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने हे स्टुडिओ उभे राहिले होते, असा आरोप भाजपच्या किरीट सोमय्यांनी केला आहे. सकाळी किरीट सोमय्या प्रतीकात्मक हातोडा घेऊन मढ येथे गेले. आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांनी या बांधकामाला परवानगी दिली होती, असा आरोप या वेळी किरीट सोमय्या यांनी बोलताना केला.