आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीका:मविआच्या नाकाखालून सरकार आणले : फडणवीस, आम्ही त्या दोघांत नाक खुपसायला जात नाही : अजित पवारांचे प्रत्युत्तर

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘मविआ’च्या नाकाखालून आम्ही त्यांचे सरकार घेऊन गेलो आणि आमचे सरकार तयार केले. आमचे सरकार टिकणार आणि पुन्हा येणार, असे टीकात्मक वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. त्यावर आम्ही त्या (शिंदे-फडणवीस) दोघांत नाक खुपसायला जात नाहीत, असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

फडणवीस म्हणाले की, ‘ज्यांना स्वत:चे सरकार टिकवता आले नाही त्यांच्या नाकाखालून आम्ही त्यांचे सरकार घेऊन गेलो आणि आमचे सरकार बनवले. कशाच्या वल्गना करताय? हे सरकार पुन्हा येणार, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार, त्यांच्याच नेतृत्वात हे सरकार निवडणुका लढणार आणि त्यांच्याच नेतृत्वात आमचे सरकार येणार.’ ते म्हणाले, माेर्चासाठी पैसे वाटतानाचे व्हिडिओ बाहेर येत आहेत, ते अक्षरशः लाजिरवाणे आहे.

पैसे वाटणारांची चौकशी करा : पवार म्हणाले, आमच्या महामोर्चात पैसे वाटले गेले हे धादांत खोटे आहे. ज्यांचे फोटो आहेत त्यांना विचारावे की, कुणी कुणाला पैसे दिले. त्याची चौकशी करायला हवी.

बातम्या आणखी आहेत...