आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिंदे- फडणवीस सरकारच्या बजेटमध्ये महिला सबलीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर, कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर, मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना आदी महत्त्वाचे निर्णय त्यासाठी घेण्यात आले. महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण, माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात ४ कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार या योजनांचाही समावेश करण्यात आला आहे.
आशा स्वयंसेविका, सेविकांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा निर्णय आधीच घेतला होता त्याची तरतूदही करण्यात आली. शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने ५० वसतिगृहांची निर्मिती केली जाणार आहे.
अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्ती सदन’ ही नवीन योजना सरकारने आणली आहे. या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा देण्यात येणार आहेत. या योजनेत ५० नवीन ‘शक्ती सदन’ निर्माण केली जाईल, अशी घोषणाही फडणवीस यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.