आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्‍प 2023 तरतूद:श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ उभारणार

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील सर्व नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी ५० कोटी रुपये, नागपूर विभागीय क्रीडा संकुलासाठी १०० कोटी रुपयांचा निधी देणार

अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर हे महानुभाव पंथाचे प्रमुख केंद्र असून मराठी साहित्याच्या विकासात त्याचे महत्त्वाचे योगदान आहे. रिद्धपूरचे हे महत्व लक्षात घेऊन त्या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मराठी भाषेतील आद्य साहित्यिक अशी ओळख असलेल्या चक्रधर स्वामींच्या नावाने रिद्धपूर या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे अमरावती शहराला आता वेगळी ओळख मिळणार आहे. दरम्यान, अर्थसंकल्पानंतर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात म्हणाले, शब्दांचे आणि आकड्यांचे फुलोरे अर्थसंकल्पात फुलवण्यात आले आहेत. ज्या गोष्टी सत्यात उतरूच शकत नाही अशा अनेक घोषणा करण्यात आल्या. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांची बेगमी करण्याचा केविलवाणा प्रयत्न अर्थसंकल्पात केलेला दिसतोय. एकीकडे अवकाळी पाऊस आणि दुसरीकडे अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस यामुळे महाराष्ट्रातील जनता हैराण आहे. निवडणुकीतील भाषणात करावयाचे अनेक मुद्दे अर्थसंकल्पात आलेले आहेत. वास्तव आणि सत्याचे भान नसलेला, कधीही पूर्णत्वास न येऊ शकणाऱ्या घोषणांचा अर्थसंकल्पात पाऊस आहे, असेही त्यांनी सांगितले.

निर्मलवारीसाठी २० कोटी, कीर्तनकार सन्मान योजनेसाठीही अर्थसंकल्पात िनधी बोलतो मराठी {विश्वकोश कार्यालय वाई (सातारा), मराठी भाषा भवन

मराठीसाठी {मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी मराठी भाषा युवक मंडळे

{सांगली नाट्यगृहासाठी : 25 कोटी रुपये {राज्यातील सर्व नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी : 50 कोटी रुपये {दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव, कोल्हापूर चित्रनगरी येथे आंतरराष्ट्रीय सुविधांसाठी : 115 कोटी रुपये {कलाकार आणि कलाप्रकार जतनासाठी महाराष्ट्र कलाकार कल्याण मंडळाची स्थापना {विदर्भ साहित्य संघाला शताब्दीनिमित्त : 10 कोटी रुपये {स्व. शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी आता : 50 कोटी रुपये

निराधार वाढीव अर्थसाहाय्य { अंत्योदयचा विचार { संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजनेत अर्थसाहाय्य आता 1000 हून 1500 रुपये { राज्य सरकार अतिरिक्त 2400 कोटी रुपयांचा भार उचलणार { प्रत्येक महिन्यात पहिल्याच आठवड्यात नियमित प्रदान

सशक्त युवा खेळांना प्रोत्साहन { खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी मिशन लक्षवेध { बालेवाडी पुणे येथे स्पोर्ट््स सायन्स सेंटर उभारणार { पुण्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठ/50 कोटी रुपये { हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देऊन अनुदान - नागपूर विभागीय क्रीडा संकुलासाठी 100 कोटी

सिंचन/पाणी असे असतील नदीजोड प्रकल्प... { दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प राज्य निधीतून { नार-पार, अंबिका, औरंगा, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नद्यांच्या उपखोऱ्यातील पाणी वापरणार { मुंबई, गोदावरी खो‍ऱ्यातील तूट भरून काढण्यासाठी पाणी वापरणार { मराठवाडा तथा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगावला लाभ { वैनगंगा खोऱ्याचे वाहून जाणारे वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्पातून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांना लाभ

असंघटितांसाठी टॅक्सी-ऑटोचालक/ दिव्यांग {३ कोटी असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ, सामाजिक सुरक्षा, कल्याणकारी योजना राबवणार { ऑटोरिक्षा व टॅक्सीचालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार { माती कारागिरीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, संतशिरोमणी गोरोबाकाका महाराष्ट्र मातीकला मंडळाला २५ कोटी { स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागामार्फत शिक्षण, पुनर्वसन, रोजगाराच्या योजना राबवणार

महामंडळ नवीन महामंडळांची स्थापना { असंघटित कामगार : महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ { लिंगायत तरुणांना रोजगार : जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ { गुरव समाज : संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ { रामोशी समाज : राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ { वडार समाज : पहिलवान कै. मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ { ही महामंडळे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत { प्रत्येकी ५० कोटी रुपयांचा निधी देणार

अल्पसंख्याकांसाठी... { अल्पसंख्याक महिलांच्या आर्थिक विकासासाठी १५ जिल्ह्यांत ३००० बचत गटांची निर्मिती { उच्च शिक्षण घेणार्‍यांना शिष्यवृत्ती: २५,००० वरून ५०,००० रुपये

सर्वांसाठी घरे योजना आणणार {या वर्षी १० लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम इतर मागासवर्गीयांसाठी ३ वर्षांत १० लाख घरांची ‘मोदी आवास घरकुल योजना’ {प्रधानमंत्री आवास योजना: ४ लाख घरे (२.५ लाख घरे अनुसूचित जाती-जमाती, १.५ लाख इतर प्रवर्ग) {रमाई आवास : १.५ लाख घरे/१८०० कोटी रुपये (किमान २५ हजार घरे मातंग समाजासाठी) {शबरी, पारधी, आदिम आवास : १ लाख घरे/१२०० कोटी रुपयांची तरतूद

बातम्या आणखी आहेत...