आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया:अर्थसंकल्प देशासाठी पाहिजे, निवडणुकांसाठी नव्हे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवउभारी देणारा अर्थसंकल्प : फडणवीस

केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाचा असतो, तो देशासाठीच हवा. अर्थसंकल्प निवडणुकांचा नसतो. मात्र आज जो अर्थसंकल्प सादर झाला, तो निवडणुकांचा असल्याचे जाणवते, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली. उद्धव यांच्या हस्ते सोमवारी कल्याण-डोंबिवली येथे शिवसेनेत प्रवेश झाले. त्या वेळी प्रसिद्धिमाध्यमांनी उद्धव यांना केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया विचारली. तेव्हा ते म्हणाले, मी अर्थसंकल्प पहिल्यांदा नीट वाचेन, मग प्रतिक्रिया देईन. मात्र माझ्या कानावर जे आले त्यावरून अर्थसंकल्प निवडणुकांचा असल्याचे दिसते, असा टोला उद्धव यांनी लगावला. केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाचा असतो. त्यात देशवासीयांच्या भावभावना, इच्छा-आकांक्षा उमटल्या पाहिजेत. अर्थसंकल्प निवडणुकांचा असता कामा नये, असे ते म्हणाले.

नवउभारी देणारा अर्थसंकल्प : फडणवीस
मुंबई | आत्मनिर्भर पॅकेजच्या माध्यमातून कोविड संकटकाळात पॅकेज जाहीर केलेले असतानासुद्धा यंदाचा अर्थसंकल्प देशातील नागरिकांच्या आकांक्षांना नवउभारी देण्याचा संकल्प दृढ करणारा आहे, अशा शब्दात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. शेती, शिक्षण, आरोग्य, रस्ते, रेल्वे, मेट्रो इत्यादी पायाभूत सुविधा, लघु आणि मध्यम उद्योजक अशा सर्वच आघाड्यांवर विकासाला एक नवीन गती देणारा हा अर्थसंकल्प आहे. बाजार समितीच्या अधिकारांवर गदा येईल, अशी शंका सर्वत्र घेतली जात होती. पण, बाजार समित्यांना भक्कम करण्यासाठी निधीची तरतूद करून सरकारने एक प्रकारे आपले धोरण स्पष्ट केल्याचे फडणवीस म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...