आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Budget Session 2022 | Maharashtra State Assembly Budget Session 2022 | Provision Of Separate Office For MPSC In The Budget; Maharashtra Bhavan Will Be Held In Navi Mumbai

अर्थमंत्र्याची घोषणा:अर्थसंकल्पात MPSC साठी स्वतंत्र कार्यालयाची तरतूद; तर नवी मुंबईत होणार महाराष्ट्र भवन

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र भवन तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कामकाजासाठी स्वतंत्र कार्यालय स्थापन करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. राज्याच्या राजधानीत कामानिमित्त येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची तात्पुरत्या निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून, नवी मुंबईत महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार आहे. याकरिता 100 कोटी रुपयाचा निधी देण्‍यात येणार आहे. अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयासाठी सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे स्वतंत्र भवनासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आतापर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कामकाज मुंबईतील एका भाड्याच्या जागी चालत आहे. त्यावर ठाकरे सरकारकडून स्वतंत्र कार्यालयाची तरतूद करण्यात आली आहे. गुढी पाढव्याच्‍या दिवशी मराठी भाषा भवनचे भूमीपूजन अजित पवारांच्‍या हस्‍ते मुंबईमध्ये पार पडणार आहे.

अजित पवारांनी विकासाची पंचसूत्री सादर करताना कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या क्षेत्रांसाठी 1 लाख 15 हजार 215 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित असल्याची माहिती दिली. कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पाच महत्वाच्या गोष्टींवर केंद्रीत अर्थसंकल्प त्यांनी सादर केला. यासाठी येत्या तीन वर्षांत 4 लाख कोटी रूपये उपलब्ध करुन देणार. अशी देखील माहिती राज्‍याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...