आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधिमंडळ अधिवेशन:देवेंद्र फडणवीसांच्या पुढच्या सुरस कथेने शॉक बसेल; साखर झोपेतल्या शपथविधीवर CM शिंदेंची टोलेबाजी

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंगणवाडी सेविकांचे मानधन २० टक्क्यांनी वाढवणार असल्याची घोषणा शुक्रवारी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत केली. तसेच दीडशे रुपये खर्चून त्यांच्यासाठी ​​​नवे मोबाइल खरेदी करणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, ही मानधनवाढ कमी असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला.

LIVE

-

अजित दादा तुम्ही सिंचनावर 70 हजार कोटी रुपये खर्च केले. मात्र, एक टक्काही सिंचन क्षेत्र वाढवू शकले नाही. पृथ्वीराज बाबांना ही कन्विन्स करू शकले नाही. मात्र, आम्ही सिंचन प्रकल्पातून 38 हजार कोटींत पाच लाख हेक्टर जमीन सिंचनखाली आणणार आहोत. लोकशाहीत कुठलेही चुकीचे काम करणार नाही. केलेले नाही, असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. शिंदे यांनी यावेळी भाजप-शिवसेना सरकारने सुरू केलेल्या कामांची यादीच फडाफडा वाचून दाखवली. यावेळीही त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला हाणायची आणि अजित पवारांना शाब्दिक चिमटा काढायची एकही संधी सोडली नाही...वाचा सविस्तर...

बच्चू कडूंचा सरकारला अफलातून सल्ला!:भटके कुत्रे उचला अन् आसामला नेऊन टाका, आम्ही गुवाहटीला गेलो तेव्हा कळाले तिथे मोठी किंमत

विधानसभेत भटक्या कुत्र्यांवर आज झालेल्या लक्षवेधीत आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारला अफलातून सल्ला दिला. ''भटके कुत्रे ते उचला अन् आसामला नेऊन टाका, आम्ही गुवाहटीला गेलो तेव्हा कळाले तिथे कुत्र्यांना मोठी किंमत आहे. एक कुत्रा आठ हजारांना विकला जातो. आपल्याकडे बोकडे तर तिकडे कुत्रे खातात'' असे म्हणत भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नी त्यांनी जालीम विलाज सुचवला. (येथे वाचा सविस्तर)

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत 'मविआ' सरकारची कुंडलीच काढली. रवी राणांच्या पत्नीला आत घातले. कंगना राणावतचे घर तोडले. गिरीश महाजन, नारायण राणे, देवेंद्र फडणवीसांच्या कुटुंबाची चौकशी लावली. आशिष शेलारांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाला. आपण असे केले. काय? जयंतराव मला माहिती आहे. दादांनाही माहिती आहे. असे प्रकार केले. हे जास्त काळ चालत नसल्याचे सुनावले. एकनाथ शिंदे म्हणाले, तुम्ही गुन्हा न करता मॉलमध्ये जाऊन माणसांना माराल, असे कसे होईल. जितेंद्र आव्हाड आपले चांगले मित्र आहेत. मात्र, सुप्रीम कोर्टाने आपली दखल घेऊन तपास करण्याच्या पोलिसांना सूचना केल्यात. मोठ्याने बोलले म्हणून सत्य लपत नाही, असा टोला त्यांनी हाणला...वाचा सविस्तर...

कांद्यावरून वांदा!:55 -70 मिलिमीटरचाच कांदा खरेदी करणार! नाफेडचे अजब माप, अंबादास दानवेंचा सभागृहात सवाल

कांद्याचे दर सातत्याने घसरत असून त्यामुळे शेतकऱ्यांवर रडायची वेळ आली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी असतानाच सरकारकडून कांद्यावरही फुलपट्टी लावली आहे. नाफेडने 55 - 70 मिलिमीटरचाच कांदा खरेदी करणार असल्यामुळे सर्वांच्याच भुवया ताणल्या आहेत. याच मुद्यावरुन विधान परिषदेच्या सभागृहात अंबादास दानवेंनी सरकारला सवाल केला आहे. यावर सभागृहात देवेंद्र फडणवीसांनी दखल घेऊ असे म्हटले असून आता सरकारकडून काय उत्तर येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (येथे वाचा सविस्तर)

- आम्हाला महाराष्ट्र द्रोही म्हणता. आमचे सरकार घटनाबाह्य म्हणता. मग तुम्ही घटनाबाह्य विरोधी पक्षनेते आहात का, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारला. घटनाबाह्य सरकारच्या जाहिराती, सगळ्या सुविधा तुम्हाला चालतात, हे कसे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला. अजित पवारांच्या यांच्याकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. मी तुम्हाला देशद्रोही म्हणालो नाही. मात्र, नवाब मलिकांचा उल्लेख केला. ज्याने मुंबई बॉम्बस्फोट घडवले. त्या दाऊदच्या माणसांशी हसिना पारकर यांच्यासोबत त्यांनी व्यवहार केला. मात्र, तुम्ही त्यांचा राजीनामा न घेता पाठिशी घातले, याची आठवणही त्यांनी करून दिली...वाचा सविस्तर...

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत तुफान फटकेबाजी केली. भाजप पोटनिवडणुकीत हरतो आणि अख्खे राज्य जिंकतो. यूपीमध्ये भाजप चार पोटनिवडणुका हरला. मात्र, हे लोकसभेत हरले. कारण हे पोटनिवडणुकीत हरतात आणि अख्खे राज्य जिंकतात, अशा शब्दांत त्यांनी कसबा निवडणुकीवर भाष्य केले. डिस्टन्स एज्युकेशन समजू शकतो. मात्र, आम्ही डिस्टन्स अॅडमिन्स्ट्रेशन अनुभवले म्हणत, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टोलेबाजी केली. तर साखर झोपेतल्या शपथविधीच्या पुढची सुरस कथा देवेंद्र फडणवीस सांगतील तेव्हा शॉक बसेल म्हणत अजित पवारांना चिमटा काढला...वाचा सविस्तर...

- आर्थिक ताळेबंद पाहून पेन्शनचा निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. तर अधिवेशन संपल्यानंतर जुन्या पेन्शन योजनेसाठी बैठक घेणार असून 2005 नंतर जॉईन झालेल्या कर्मचाऱ्यांना मेजर निवृत्ती जवळ आलेली नाही, आम्ही जुन्या पेन्शन योजनेसाठी नकारात्मक नाही, असेही फडणवीस म्हणाले...वाचा सविस्तर...

- आंतरराष्ट्रीय स्पर्धांत देशाचे नावलौकिक उंचावणाऱ्या खेळाडूंना सरकारी नोकरीमध्ये घेतलं जात नाही. अत्यंत कष्टाने व जिद्दीने हे खेळाडू देशासाठी पदक मिळवतात, पण आपण त्यांचा योग्य तो सन्मान करू शकत नाही, ही खेदजनक बाब आहे. त्यामुळे फक्त समित्या नेमून वेळकाढूपणा करण्यापेक्षा याबाबत ठोस व ताबडतोब निर्णय घ्यावा, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. त्यावरील उत्तरात कविता राऊत, दत्तू भोकनळ व अंजना ठमके या खेळाडूंना नवीन क्रीडा धोरणाची अंमलबजावणी करून वर्ग १ पदी तात्काळ नोकरीत सामावून घेतले जाईल, अशी माहिती राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली...वाचा सविस्तर...

- राज्य शासनाच्या औषध प्रशासन विभागातर्फे कफ सिरफ तयार करणाऱ्या 84 कंपन्यांची तपासणी करण्यात आली असून, 17 दोषी कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, 4 कंपन्यांचे उत्पादन बंद तर 6 कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती औषध प्रशान मंत्री संजय राठोड यांनी दिली...वाचा सविस्तर...

- विविध आयुधांच्या माध्यमातून सभागृहात सदस्य विविध प्रश्न तळमळीने मांडत असतात. यावेळी सरकारच्यावतीने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक लावण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, अनेक मंत्र्यांकडून सभागृहात आश्वासन दिलेल्या बैठकाच घेतल्या जात नाहीत, याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.

- राज्यातल्या सर्वसामान्यांचे प्रश्न सदस्य सभागृहात विविध संसदीय आयुधांचा वापर करुन मांडत असतात. हे प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित मंत्री सभागृहात याविषयी बैठकी घेण्याचे आश्वासन देत असतात. मात्र आश्वासन दिलेल्या अनेक बैठका घेतल्याच जात नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न सुटत नाहीत, त्यावर कोणताही मार्ग निघत नाही. त्यामुळे सभागृहात सदस्यांना बैठका घेण्याचे दिलेले आश्वासन पाळले जावे,‍ किमान पुढचे अधिवेशन येईपर्यंत तरी बैठकींचे आयोजन केले जावे, अशी सदस्यांची भावना अजित पवार यांनी सभागृहात व्यक्त केली.

- अंगणवाडी सेविकांचे मानधन २० टक्क्यांनी वाढवणार. सेविकांना दीडशे कोटी रुपये खर्चून नवे मोबाइल खरेदी करणार. अंगणवाडीचे भाडे एक हजारावरून दोन हजार रुपये केले. महापालिकेतील भाडेवाढीचा निर्णय लवकर घेणार. कंटेनर अंगणवाडी सुरू करणार. पहिल्या अंगणवाडीचे आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. अंगणवाडी सेविकांची एंट्री फक्त नाव इंग्रजीत टाकावे लागेल. इतर माहिती मराठी भरता येईल, अशी माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली...वाचा सविस्तर...

- बायोमेट्रीक हजेरी बंधकारक करणार. मुंबई, पुणे आरोग्य केंद्रात चोवीस तास मॉनिटरींग करणार. वैद्यकीय अधिकारी गट एक ९८३ पदे रिक्त आहेत. सध्या ७५ हजार भरती सुरू आहे. त्यात ही रिक्त पदे भरली जाणार, अशी माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली.

- ग्रामीण रुग्णालये आणि इतर सर्व सरकारी रुग्णालयात बायोमॅट्रीक हजेरी बंधनकारक करा. आरोग्य विभागीतील वर्ग तीन आणि वर्ग चारमधील पन्नास टक्के जागा रिक्त आहेत. त्या तातडीने भराव्यात, अशी मागणी विधानसभेत आमदार राजेश टोपे यांनी केली.

काल हे मुद्दे गाजले

- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आमदार राम सातपुते उल्लेख एकेरी केला. यावरुन विधानसभेत आज गदारोळ झाला. यावर माफी मागण्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली. त्यानंतर मी रेकार्ड तपासतो असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. त्यानंतर लगेचच आशिष शेलार यांनी जबाबदारी घेत दिलगिरी व्यक्त करीत माफी मागितली, त्यानंतर राम सातपुते यांनीही दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे हा गदारोळ संपुष्टात आला...वाचा सविस्तर...

- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे मुंबईत बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दाऊदबरोबर संबंध आहेत. त्यामुळे मलिक हे देशद्रोही आहेत. देशद्रोह्याला देशद्रोही म्हणणे हा गुन्हा असेल तर असा गुन्हा मी पन्नासवेळा करेन, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात ठणकावून सांगितले. यावर नवाब मलिक यांच्याविरोधातील आरोप सिद्ध झाले नाहीत, असे प्रत्युत्तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. विरोधी पक्षातील नेत्यांना महाराष्ट्रद्रोही, देशद्रोही असे म्हटल्याबद्दल विधानपरिषदेत मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत विरोधक आहेत. यावर आज विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा केला...वाचा सविस्तर...

- मला एका महिन्याच्या आत जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा खळबळजनक आरोप आज विधानसभेत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला. आमदार भास्कर जाधव आज विधानसभेत म्हणाले, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विधानसभेत कठोर शब्दांत टीका केली होती. त्यानंतर लगेच माझ्याकडे चौकशी अधिकारी पाठवण्यात आले. मला एका महिन्याच्या आत जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी तुरुंगात जायला घाबरत नाही. मी तुरुंगात जायला तयार आहे. मात्र, या प्रकरणात माझ्या मुलाचेही नाव गोवण्यात आले आहे...वाचा सविस्तर...

- राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येऊ नये यासाठी नाफेडच्या माध्यमातून प्रत्यक्षात बाजार समितीत कांदा खरेदी करण्यासोबतच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे, अशी मागणी आमदार छगन भुजबळ यांनी आज स्थगन प्रस्तावाद्वारे सभागृहात केली. शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबत निर्णय विचाराधीन असून, लवकरच या निर्णयाची घोषणा केली जाईल याबाबत सभागृहासमोर प्रत्यक्ष निवेदन करण्यात येईल अशी माहिती छगन भुजबळ यांनी विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली...वाचा सविस्तर...

- के. जे. सोमय्या कॉलेजमधील विद्यार्थी डहाणू येथे शिबिरास गेले असताना शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना अर्धनग्नकरून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी तारांकित प्रश्नाद्वारे सभागृहात केली. त्यावर दोन दिवसात सविस्तर अहवाल सभागृहात सादर केला जाईल अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली...वाचा सविस्तर...

- कसबा पोटनिवडणुकीच्या निकालावरून विधिमंडळ अधिवेशनात जोरदार जुगलबंदी रंगली. यावेळी नाना पटोले यांनी रवींद्र धंगेकर विजयी झाले असून, त्यांना विधानसभेत बसण्याची जागा द्यावी, अशी विनंती अध्यक्षांना केली. तेव्हा त्यांना राहुल नार्वेकरांनी चिमटा काढलाच, तर देवेंद्र फडणवीसांनी तुम्ही कुठे दिसतच नाही, असा टोला हाणला. कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी 11 हजार 40 मते घेत भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव केला. हा निकाल येताच विधानसभेत नाना पटोले यांनी आनंद व्यक्त केला. त्यावरून खडाजंगी रंगली...वाचा सविस्तर...

- अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधानभवनाच्या आवारात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पुण्यातील पोटनिवडणुकीवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, भाजपने ही निवडणुक प्रतिष्ठेची केली आहे. या दोन्ही जागा भाजपकडे होत्या आणि यातील एक जरी जागा महाविकास आघाडीकडे आली तर हा भाजपला धक्का असेल. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...