आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना पक्षप्रमुखांचे आवाहन:एलआयसीप्रमाणे शिवसेनेबद्दल विश्वास निर्माण करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ ही ‘एलआयसी’ची जाहिरात आहे, तसा विश्वास शिवसेनेबद्दल असायला हवा. कितीही संकटे येऊ देत, प्रत्येक पावलावर शिवसेना आपल्यासोबत आहे, हा विश्वास देशभर पोहोचवा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (६ मे) केले. भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

उद्धव म्हणाले, आपले घर भले आणि आपण भले, असा मराठी माणसाविषयीचा समज आहे. पण, तुम्ही कमाल केलीत. घर तर सांभाळलेत व देशभरही पसरलात. आव्हानांनी भरलेला तुमचा रस्ता होता. त्या रस्त्याने केवळ मर्दच चालू शकतात. कारण त्यांच्यातच हिंमत असते, असे उद्धव म्हणाले.

२५ वर्षांपूर्वी आपण विचार केला नव्हता की माझी युनियन नंबर एकची युनियन असेल आणि तेव्हा मी मुख्यमंत्री असेन. मुख्यमंत्री होणे माझे कधी स्वप्न नव्हते. माझ्या पक्षाचा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल हे माझे स्वप्न होते आणि हे स्वप्न कायम राहील. जर स्वप्नच नसेल तर आपण राहूच शकत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...