आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इमारत कोसळली:मुंबईत पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली 5 ते 6 जण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील वांद्रे येथे पाच मजली इमारत कोसळली आहे. इमारतीत पाच ते सहा जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) अधिका-यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी साडेचार वाजता वांद्रे (पूर्व) येथील बेहराम नगर भागात ही घटना घडली.

इमारत कोसळल्यानंतर अग्निशमन दलाच्या पाच गाड्या, एक रेस्क्यू व्हॅन आणि सहा रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या होत्या. बचावकार्य सुरू आहे.

मंगळवारीही मालाड पश्चिम येथील मालवणी भागात दुमजली घर कोसळून दोन जण जखमी झाले होते. मंगळवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास ही घटना घडली होती.

बातम्या आणखी आहेत...