आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन सुरुवातीची पहिली झलक:मुंबई ते अहमदाबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेनचे फोटो आले समोर, 320 सेंकदात 320 KM/hचा वेग पकडेल

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद अंतर केवळ 2 तासाचे होईल

मुंबई-अहमदाबाद दरम्यान सुरू होणारी बुलेट ट्रेनची पहिली छायाचित्रे समोर आली आहेत. भारतातील जपान दूतावासाने ई 5 सिरीज शिंकान्सेन बुलेट ट्रेनची काही छायाचित्रे शेअर केली आहेत. ही ट्रेन मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान समर्पित ट्रॅकवर धावेल, असे मानले जात आहे. देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. पुलांचे, बोगद्याचे डिझायनिंगचे सुमारे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. ही रेल्वे रुळावर आली, तर मुंबई ते अहमदाबाद हे अंतर अवघ्या 2 तासात पूर्ण होईल.

2023 पर्यंत मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. पीएम मोदी आणि त्यांचे तत्कालीन जपानी समकक्ष शिन्झो आबे यांनी 14 सप्टेंबर 2017 रोजी या महत्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली होती. अशाप्रकारे, जपानचे आयकॉनिक 'शिंकन्सेन' बुलेट-ट्रेन तंत्रज्ञान विकत घेणारा भारत तैवाननंतर पहिला देश बनला. टोकियोने प्रकल्प खर्चाच्या एकूण 80 टक्के म्हणजेच 88 हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्यास संमती दर्शवली होती.

2023 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याची योजना

मार्च 2020 पर्यंत बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू होईल अशी केंद्र सरकारची योजना आहे. हा प्रकल्प डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करावा लागणार आहे. अहमदाबाद ते मुंबई (508 किमी) दरम्यान बुलेट ट्रेन कॉरिडोरमध्ये 12 स्थानके असतील. रेल्वेच्या एकूण अंतरापैकी 21 किमी अंतर बोगद्यातून असेल, ज्यामध्ये सात किमी समुद्राखाली असेल. बुलेट ट्रेन 320 किमी प्रतितास वेगाने धावेल. त्याची कमाल वेग 350 किमी प्रति तास असेल. ही गाडी 320 सेकंदात 320 किमी प्रतितासाचा वेग पकडले. ट्रेन हा वेगापर्यंत पोहोचेपर्यंत निघालेल्या स्थानकापासून 18 किमी अंतर पार केले असले.

रेल्वे रुळ भूकंप प्रतिरोधक असतील

ही बुलेट ट्रेन महाराष्ट्रातील 108 गावातून जाणार आहे. बहुतेक गाव पालघर जिल्ह्यात आहे. संपूर्ण प्रकल्प अग्नि आणि भूकंप प्रतिरोधक असेल. भू-संवेदनशील भागात भूकंप मापन आणि पवन मोजण्यासाठी यंत्रणा बसविली जातील. ट्रेनचा वेग वाराच्या वेगावर अवलंबून असेल आणि जर वारा चालू 30 मीटर प्रति सेकंद असेल तर रेल्वे धावणार नाही.

3 हजार रुपयांपर्यंत असेल भाडे

बुलेट ट्रेन प्रकल्पाचे एमडी अचल खरे यांनी सप्टेंबरमध्ये सांगितले होते की त्याचे भाडे सुमारे 3 हजार रुपये असेल. या संपूर्ण प्रकल्पासाठी 1380 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. यात खाजगी, सरकारी, जंगल आणि रेल्वे जमीनीचा (गुजरात आणि महाराष्ट्रात) समावेश आहे.

देशातील या मार्गांवर बुलेट ट्रेन चालविण्याची तयारी

भारतीय रेल्वेने देशात बुलेट ट्रेन प्रकल्प वाढविण्याच्या योजनेवर काम सुरू केले आहे. शुक्रवारी बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर देशातील 12 नवीन मार्गांवर रेल्वेकडून प्रस्ताव देण्यात आला.

दिल्ली-चंदीगड-लुधियाना-जालंधर-अमृतसर HSR कॉरिडोर.

दिल्ली-आग्रा-कानपूर-लखनऊ-वाराणसी-HSR कॉरिडॉर.

कटिहार आणि न्यू जलपाईगुड़ी मार्गे पाटणा ते गुवाहाटीपर्यंत अतिरिक्त HSR लाइन.

मुंबई हैदराबाद HSR लाइनचा विस्तार करून हैदराबाद आणि बंगळुरू दरम्यान अतिरिक्त HSR लाइन

नागपूर आणि वाराणसी दरम्यान अतिरिक्त HSR लाइन प्रस्तावित आहे.

बातम्या आणखी आहेत...