आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Bulli Bai App | Marathi News | Mumbai Police | Mumbai Police Detained Engineering Student From Bangalore, Delhi Police Also Started Investigation

मुस्लिम महिलांची बदनामी प्रकरण:महिलांचे फोटो एडिट करून वापरणाऱ्याला मुंबई पोलिसांनी बंगळुरुतून केली अटक; बुली बाई अ‍ॅपची दिल्ली पोलिसांकडूनही चौकशी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुस्लिम महिलांची बुली बाई या अ‍ॅपवरुन बदनामी केली जात असल्याचे वृत्त समोर आले होते. त्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने एका जणाला ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांनी बंगळुरु येथून एका 21 वर्षीय युवकाला ताब्यात घेतले आहे. तो इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहे. सध्या मुंबई पोलिसांनी आरोपीबाबत अधिकची माहिती दिलेली नाही. मात्र मुंबई पोलिसाने त्याला ताब्यात घेतले असून, आरोपीला आता मुंबई आणले जात आहे.

तर तिकडे दिल्ली पोलिसांनी गिटहब प्लॅटफार्मकडून या अ‍ॅप्स डेव्हलपर्स विषयी अधिकची माहिती मागितली आहे. सोबतच ट्विटला याविषयी असलेले आक्षेपार्ह पोस्ट हटवण्याचे देखील दिली पोलिसांनी सांगितले आहे.

एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल

मुस्लिम महिलांची इंटरनेटवर होत असलेल्या बदनामी विरोधात रविवारी दक्षिण मुंबईतील एका पोलिस ठाण्यात आयटी कायदा आणि आयपीसी सेक्शन अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिटहब प्लॅटफार्मच्या बुली बाई या अ‍ॅप्सच्या माध्यमातून महिलांचे फोटो एडिट करुन आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल
मुंबई पोलिसांनी रविवारी दाखल केलेल्या गुन्ह्यात आयपीसी कलम 153- ए ( धार्मिक आधारावर दोन समुदायामध्ये भेदभाव), कलम 153-बी ( जाणूनबुजून धार्मिक भावना दुखावणे), 354-डी ( पाठीमागे लागणे), 509 (महिलांची बदनामी करण्याचा प्रयत्न) आणि कलम 500 (अपराधिक मानहानी) या कलमाखाली मुंबई सायबर सेलने गुन्हा दाखल केला आहे. सोबतच आयटी कलम 67 (इंटरनेटवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणे) या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी डेव्हलपर्सची माहिती मागवली
दिल्ली पोलिसांनी सोमवारी डॉजी अ‍ॅप्लिकेशनच्या डेव्हलपर्सला गिटहब प्लेटफार्मविषयी अधिकची माहिती मागितली होती. तर ट्विटरला देखील महिलांशी संबंधित आक्षेपार्ह मजकूर हटवण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. पोलिसांनी ट्विटरवर गिटहबसंबंधी सर्वात अगोदर ज्या व्यक्तीने ट्विट केले होते, त्याविषयी माहिती मागितली आहे.

प्रियंका चतुर्वेदींनी केली होती तक्रार
मुस्लिम महिलांची इंटरनेटवर बदनामी होत असल्याचा आवाज सर्वप्रथम शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी उठवला होता. त्यांनी बुली अ‍ॅपला बंदी घालण्याची मागणी केली होती. प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांना देखील यासंबधी लवकरात-लवकर कारवाई करावी अशी मागणी केली होती.

आयटी मंत्र्यांनी अ‍ॅप्सवर घातली बंदी
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या तक्रारीवरुन केंद्रीय आयटी विभागाने बुली बाई या अ‍ॅप्सला ब्लॉक केले आहे. आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी रात्री प्रियंका गांधींनी ट्विट करत अ‍ॅपला बंदी घातल्यात आल्याची माहिती दिली होती.

दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी सुरू केला तपास
प्रियंका गांधींनी दिलेल्या तक्रारीनंतर मुंबई आणि दिल्ली पोलिसांनी यासंबधी तपास सुरू केला आहे. दिल्लीत एका पत्रकाराने देखील यासंबधी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मागील वर्षी देखील सुल्ली-डील्सवरुन झाला होता वाद

बुली बाई अ‍ॅपला सुल्ली डील्सचे क्लोन असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये सुल्ली डीलवरुन वाद निर्माण झाला होता. सुल्लीच्या माध्यमातून मुस्लिम महिलांची बदनामी केली जात होती. या अ‍ॅपचे मुख्य उद्दिष्ट मुस्लिम महिलांची बदनामी करुन त्यांना लज्जास्पद करणे हे आहे.

बातम्या आणखी आहेत...