आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या डागडुजीचा विषय सध्या चर्चेत आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे. मात्र असे असताना मंत्र्यांचे बंगले आणि मंत्रालयातील दालनांवर कोट्यावधींची उधळपट्टी केली जात असल्याचे बोलले जात आहे. यातच आता मुंबई महापालिकेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांचे शासकीय बंगले डिफॉल्टर यादीत टाकल्याची माहिती समोर आली आहे.
एखाद्या सामान्य मुंबईकराने दोन-तीन महिन्यापेक्षा जास्त पाण्याची थकबाकी ठेवली तर बृहन्मुंबई महानगरपालिका त्याचे नळ कनेक्शन बंद करते. परंतू, महानगरपालिका मंत्र्यांच्या बाबतीत असे करताना दिसत नाही. मुख्यमंत्री आणि इतर अनेक मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर पाण्याची एकूण 24 लाख 56 हजार 469 रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळवर पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती मिळवली आहे. या माहितीच्या आधारे मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर पाण्याच्या एकूण 24 लाख 56 हजार 469 थकबाकी आहे. त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा (वर्षा बंगला), उपमुख्यमंत्री अजित पवारंचा (देवगिरी), जयंत पाटील (सेवासदन), नितीन राऊत, उर्जा मंत्री (पर्णकुटी), बाळासाहेब थोरात (रॉयलस्टोन), विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (सागर), अशोक चव्हाण (मेघदूत), सुभाष देसाई, उद्योगमंत्री (पुरातन), दिलीप वळसे पाटील (शिवगिरी), सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे (नंदनवन), राजेश टोपे (जेतवन), नाना पटोले, विधानसभा अध्यक्ष (चित्रकुट), राजेंद्र शिंगणे (सातपुडा), नवाब मलिक (मुक्तागीरी), छगन भुजबळ (रामटेक), रामराजे नाईक निंबाळकर विधानभवन सभापती (अजिंठा) आणि सह्याद्री अतिथीगृह याचा समावेश आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.