आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रत्नागिरीत भीषण अपघात:50 फूट खोल दरीमध्ये कोसळली प्रवाशांनी भरलेली बस, कशेडी घाटात पहाटे चारच्या सुमारास झाला अपघात

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका सात वर्षीय चमुकल्याने या अपघातात जीव गमावला आहे.

रत्नागिरीमध्ये खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. कशेडी घाटात ही बस तब्बल 50 फूट खोल दरीत कोसळली आहे. चिंतामणी नावाची ही खासगी बस मुंबई येथून कणकवलीच्या दिशेने जात होती. याच वेळी हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान बसमधील जवळपास 15 प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. तर एका चिमुकल्याचा या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती आहे.

पहाटे चार वाजेदरम्यान हा भीषण अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली. यानंतर पोलिसांनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तात्काळ बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली. जवळपास 25 जणांना बाहेर काढले आहे. तर एका सात वर्षीय चमुकल्याने या अपघातात जीव गमावला आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...