आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयएम शिवसेनेची 'बी' टीम:शिवसेनेला मत देऊन एमआयएम आणि इम्तियाज जलील उघडे पडले- फडणवीस

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेला राज्यसभा निवडणूकीत मत देऊन एमआयएम आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील उघडे पडले आहेत. शिवसेनेशी संधान साधणारी एमआयएम शिवसेनेची बी टीम असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने भाजपची रणनिती आखण्यासाठी आज मुंबईत बैठक झाली. या बैठकीनंतर फडणवीस माध्यमांशी बोलत होते.

औरंगाबादचे खासदार आणि एमआयएमचे नेते सय्यद इम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडेंना भाजप सोडून नवा पक्ष काढण्याचा सल्ला दिला. याविषयी फडणवीसांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता त्यांनी थेट उत्तर देत इम्तियाज जलील काय बोलले याबाबत मला काहीच बोलायचे नाही कारण ते पुरते उघडे पडले आहेत अशी टीका केली.

काय म्हणाले फडणवीस?

फडणवीस म्हणाले, शिवसेनेला राज्यसभा निवडणूकीत मत देऊन इम्तियाज जलील आणि एमआयएमने स्वतःला उघडे पाडले आहे. शिवसेनेशी संधान साधणारी एमआयएम शिवसेनेची 'बी' टीम आहे. भाजप कुठल्याही व्यक्तीला टार्गेट करण्यासाठी निवडणूक लढवत नाही तर आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप काम करीत असल्याचे स्पष्ट करीत पंकजा यांना तिकीट न दिल्यावरुन आपली स्पष्ट भूमिका फडणवीसांनी मांडली.

काय म्हणाले होते इम्तियाज जलील?

एमआयएमचे नेते तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडेंना सल्ला दिला. ते म्हणाले की, पंकजा मुंडे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत नवा पक्ष स्थापन करायला हवा. त्यांनी नव्या पक्षाची स्थापना केली तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होईल असे भाकितही त्यांनी केले. पंकजा मुंडे यांना भविष्य आहे. त्यांच्या नावापुढे गोपीनाथ मुंडे यांचे नाव आहे. गोपीनाथ मुंडे यांना माणणारा खूप मोठा वर्ग आहे.

पंकजा ओबीसींच्या नेत्या

राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी खूप काम केले. हे काम कोणीही विसरले नाही. मग इतकी लाचारी कशाला? विधानपरिषद दिली नाही तर फक्त नाराजी कशाला. त्यांनी दुसऱ्याच दिवशी पक्षाला सोडचिठ्ठी देत नव्या पक्षाची घोषणा करायची असती. त्या ओबीसीच्या नेत्या म्हणून उभ्या राहतील तेव्हा त्यांच्या मागे किती मोठी ताकद उभी राहील हे पाहायला मिळेल असे ही सय्यद इम्तियाज म्हणाले.

पंकजा यांच्या बहीण प्रीतम मुंडे खासदार आहेत. त्यांनाही मी याबाबत एक दोन वेळा सुचवले आहे. मला त्यांना हे सुचवण्याचा अधिकार नाही. मात्र पूर्वीचा एक पत्रकार म्हणून मला असे वाटते की त्यांनी असा मोठा निर्णय घेतला तर महाराष्ट्रात राजकीय भूकंप येईल आणि त्यानंतरच लोकांना मुंडे परिवाराची काय ताकद आहे हे समजू शकेल,” असे जलील म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...