आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया; प्रकृती स्थिर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर ८ जुलै रोजी तातडीने बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. ते सध्या आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नाही, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी कळवले आहे. आणखी काही दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येईल. त्यांच्या प्रकृतीची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक पेजवरून रोज देण्यात येईल, असे वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी कळवले आहे.

दरम्यान, रेखा ठाकूर यांनी याबाबत गुरुवारी सांगितले होते की, प्रकृतीच्या कारणामुळे ॲड. प्रकाश आंबेडकर पुढील तीन महिने पक्षाच्या आणि कुठल्याही राजकीय कार्यक्रमात सहभाग घेणार नाहीत. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आंबेडकर यांना सक्तीची विश्रांती सांगितल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...