आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराचा उडणार बार:महामंडळ वाटप त्यानंतर, शिंदे गटाच्या आमदारांची माहिती

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल यांनी दिली. त्यामुळे या विस्तारात कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता लागलीय.

मंत्रिपद न मिळाल्यामुळे औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट ते बच्चू कडूपर्यंत अनेक जण नाराज आहेत. या विस्तारात त्यांना संधी मिळते का, हे पाहावे लागेल.

काय म्हणाले जयस्वाल?

आशिष जयस्वाल म्हणाले की, मला असे वाटते की अधिवेशनाच्या पूर्वी विस्तार होईल. तेव्हा सर्व चर्चेला विराम लागेल. अगोदर मंत्रिमंडळ विस्तार होईल, त्यानंतर महामंडळाचे वाटप होईल, अशी शक्यता जयस्वाल यांनी वर्तवली.

अन्यथा महामंडळ

राज्यातल्या महामंडळाचे वाटपही रखडले आहे. ज्यांना मंत्रिपद मिळणार नाही, त्यांची महामंडळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे शिंदे गटासोबत येणारे अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. अनेक जण नाराजी दाखवत आहेत. संजय शिरसाटांनी या नाराजीतून ट्विट करून ते नंतर डिलिट केले. त्याची चर्चा चांगलीच रंगली होती.

सध्याचे मंत्रिमंडळ असे...

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आहेत.

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती आहेत.

- राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

- सुधीर मुनगंटीवार - वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

- चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

- डॉ. विजयकुमार गावित - आदिवासी विकास

- गिरीश महाजन - ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

- गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा व स्वच्छता

- दादा भुसे - बंदरे व खनिकर्म

- संजय राठोड - अन्न व औषध प्रशासन

- सुरेश खाडे - कामगार

- संदीपान भुमरे - रोजगार हमी योजना व फलोत्पादन

- उदय सामंत - उद्योग

- प्रा.तानाजी सावंत - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

- रवींद्र चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

- अब्दुल सत्तार - कृषी

- दीपक केसरकर - शालेय शिक्षण व मराठी भाषा

- अतुल सावे - सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

- शंभूराज देसाई - राज्य उत्पादन शुल्क

- मंगलप्रभात लोढा - पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास​

बातम्या आणखी आहेत...