आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड कोरोना पॉझिटिव्ह पोलिस अधिकाऱ्याच्या संपर्कात, स्वतःला केले होम क्वारंटाइन

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • अनेक पत्रकार देखील या कोरोना पॉझिटिव्ह पोलिस अधिकाऱ्याच्या संपर्कात, एकाला लागण

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला होम क्वारंटाइन करून घेतले आहे. जितेंद्र आव्हाड कोरोना पॉझिटिव्ह पोलिस अधिकाऱ्याच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून आव्हाड यांनी स्वतःला होम क्वारंटाइन करून घेतले आहे. स्वतःला होम क्वारंटाइन करून घेणारे आव्हाड पहिले मंत्री आहेत. 

अनेक पत्रकारही पीएसआयच्या संपर्कात

शहरातील परिस्थितीचा आढावा घेताना अनेक पत्रकार देखील या कोरोना पॉझिटिव्ह पोलिस अधिकाऱ्याच्या संपर्कात आले आहेत. त्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील एक पत्रकाराल कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यानंतर आता सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

कोरोनाने महाराष्ट्रात शिरकाव केल्यानंतर शासन आणि प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी रस्त्यावर उतरून परिस्थिती हाताळत आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड देखील आपला कळवा आणि मुंब्रा मतदारसंघात रस्त्यावर उतरून लॉकडाऊनच्या स्थितीचा आढावा घेत होते. त्यावेळी आव्हाड यांचा एका पीएसआयशी संपर्क आला जो आता कोरोना पॉझिटिव्ह निघाला, अशी माहिती आहे. 

बातम्या आणखी आहेत...