आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपाल कोश्यारी यांना दिल्लीत पाचारण:24-25 नोव्हेंबर रोजी दौरा, कोश्यारींची कानउघाडणी की उचलबांगडी याची उत्सुकता

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. राज्यपालांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहे. छत्रपती घराण्याचे वंशज आणि महाविकास आघाडीने राज्यपाल कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यपाल कोश्यारी यांना तातडीने दिल्लीला पाचारण करण्यात आले असल्याचे समजते.

औरंगाबादेत वक्तव्याआधीही राज्यपाल कोश्यारींनी अनेकवेळा राज्यातील भाजप नेतृत्वाला अडचणीत आणणारी विधाने केली आहेत. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यामुळे राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्याने त्याचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटले. त्याची गंभीर दखल भाजप श्रेष्ठींनी घेतल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी २४ आणि २५ तारखेला दिल्लीला जाणार आहे. यावेळी ते नेमके कोणाला भेटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच भाजपचे केंद्रीय नेतृत्त्व कोश्यारी यांना पदमुक्त करण्याच्यादृष्टीने काही पावले टाकणार का, याविषयी चर्चांना उधाण आले आहे.

कोश्यारींची कानउघाडणी की उचलबांगडी याची उत्सुकता भगतसिंह कोश्यारी यांचा दिल्ली दौरा नियोजित असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कोश्यारी यांची कानउघडणी करण्यासाठी त्यांना भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिल्लीला बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता कानउघाडणी करणार की उचलबांगडी यादोन्हीपैकी येत्या दोन दिवसांमध्ये काय घडणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

बातम्या आणखी आहेत...