आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शैक्षणिक:विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा, मनसेप्रमुख राज ठाकरे यांची मागणी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांवरून राज्यपाल व राज्य सरकारमध्ये मतभेद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांवरून राज्यपाल व राज्य सरकारमध्ये मतभेद आहेत. राज्यपाल परीक्षा घेण्याबाबत आग्रही आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी परीक्षा रद्द केल्या जाव्यात अशीच मागणी केली आहे. संपूर्ण देश दोन महिन्यापासून लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी, असा थेट सवाल राज्यपालांना केला आहे.

राज म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव किती भयंकर आहे याची कल्पना आपल्याला आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घराबाहेर काढून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात घालण्यामागचे नक्की प्रयोजन काय? अर्थव्यवस्थेचे अपरिमित नुकसान होत असताना केवळ जीव वाचावे म्हणून संपूर्ण देशाने टाळेबंदी झेलली. मग याच न्यायाने विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यायला काय हरकत आहे? परीक्षा रद्द करणे म्हणजे सरसकट पास करणे असा याचा अर्थ होत नाही, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...