आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस भरती:सन 2019 च्या पोलिस भरतीचे उमेदवार खुल्या प्रवर्गात समाविष्ट, गृह विभागाचे आदेश, 800 पोलिस शिपाई भरतीची होती जाहिरात

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • २०१८ मध्ये फडणवीस सरकारने मराठा समाजाला एसईबीसी आरक्षण दिले.

२०१९ मध्ये पोलिस भरतीच्या प्रसिद्ध जाहिरातीत सुधारणा करण्याचे आदेश गृह विभागाने सोमवारी जारी केले. भरतीसाठी सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून (एसईबीसी) अर्ज केलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात समाविष्ट करा, असे आदेश पोलिस महासंचालक कार्यालयास दिले आहेत.

२०१८ मध्ये फडणवीस सरकारने मराठा समाजाला एसईबीसी आरक्षण दिले. जून २०१९ मध्ये मुंबई हायकोर्टाने ते वैध ठरवले. दरम्यान, राज्यात २०१९ मध्ये ८०० वर पोलिस शिपाई पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यात एसईबीसी आरक्षण कायम होते. हजारो उमेदवारांनी एसईबीसी प्रवर्गातून अर्ज दाखल केले. मात्र सप्टेंबर २०२० मध्ये सुप्रीम कोर्टाने एसईबीसी आरक्षणास स्थगिती दिली. त्यामुळे २०१९ मध्ये प्रकाशित जाहिरातीत आता सुधारणा केली जाईल. तेव्हा एसईबीसी प्रवर्गातून अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचा समावेश खुल्या वर्गाचे उमेदवार म्हणून करावा, असे निर्देश राज्य शासनाने जारी केले. मराठा समाजाला यापुढे ईडब्ल्यूएस आरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. त्यानुसार शासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. मराठा आरक्षणाचा खटला घटनापीठाकडे वर्ग करण्यात आला. जानेवारी महिन्यात याप्रकरणी सुनावणी होणार आहे. त्यादरम्यान महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करता येणार नाही. एसईबीसी प्रवर्गाचे उमेदवार म्हणून कमी शुल्क भरले होते. त्यांना खुल्या वर्गाच्या उमेदवारांसाठी असणारे शुल्कही द्यावे लागणार आहे. शुल्कातील फरकाची रक्कम भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...