आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी महाराष्ट्राचे पुढील राज्यपाल होण्याच्या सुरु असलेल्या अफवांवर आता मौन सोडले आहे. कॅप्टन यांनी याबद्दल आपल्याला कुठलीही कल्पना नसल्याचे सांगितले आहे. परंतु त्यांनी हे नाकारलेही नाही. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी जो काही निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल, असे कॅप्टन म्हणाले. पीएम सांगतील त्याठिकाणी मी जाईल. असेही ते म्हणाले.
अमरिंदर म्हणाले, हे पूर्णपणे काल्पनिक आहे. माझ्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही. मला याबाबत काहीच माहिती नाही. मी आधीच पंतप्रधानांना सांगितले आहे की, त्यांना जिथे हवे असेल त्याठिकाणी नियुक्तीसाठी मी तयार आहे.
कॅप्टन यांच्या नावाची चर्चा का?
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीत राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यानंतर महाराष्ट्रातील नवीन राज्यपालांची नियुक्ती निश्चित झाल्याचे मानले जात आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याच नावाची चर्चा सुरु आहे.
कॅप्टन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्याचवेळी, भाजपने यापूर्वीच अमरिंदर यांचा 83 सदस्यीय राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश केला आहे. गृहमंत्री अमित शहा यांची 29 जानेवारीला पटियाला रॅली होणार असतानाही कॅप्टन यांच्या नव्या भूमिकेची चर्चा तीव्र झाली. ते नंतर रद्द करण्यात आले.
लोकसभा निवडणूकीबाबत सांगणे घाईचे ठरेल
कॅप्टन अमरिंदर सिंग पुढील लोकसभा निवडणूक लढवणार की नाही या प्रश्नावर ते म्हणाले - हे सांगणे घाईचे आहे. पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत कॅप्टन यांनी स्पष्टपणे काहीही सांगितले नाही. सध्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी महाराणी प्रनीत कौर या पतियाळाच्या खासदार आहेत.
उपराष्ट्रपतीसाठीही होती चर्चा
उपराष्ट्रपतीपदासाठी कॅप्टन अमरिंदर सिंग यांचेही नाव चर्चेत आले. मात्र, नंतर भाजपने पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांना उमेदवारी दिली. त्यावेळी कॅप्टन परदेशात उपचार घेत होते. तेव्हा कॅप्टन यांनी आपला पक्षही वेगळा ठेवला होता. आता त्यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला आहे.
संबंधित वृत्त
कॅप्टन अमरिंदर सिंग महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?
पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण याची अद्याप पुष्टी झाली नाही. भाजप नेतेही यावर भाष्य करण्यास तयार नाहीत. पण भाजपने अमरिंदर यांना महाराष्ट्राचे राज्यपाल पद देऊन पंजाबमध्ये राजकीय फायदा लाटण्याची जोरदार तयारी केल्याची माहिती आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.