आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशातील पहिली स्पोर्ट्स कार बनवणाऱ्याला अटक:कार डिझाइनर दिलीप छाब्रिया यांना फसवणुकीच्या प्रकरणात सोमवारी रात्री केली अटक

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिलीप छाब्रिया यांनी अमिताभ बच्चनपासून शाहरुख खानपर्यंत अनेकांच्या कार डिझाईन केल्या आहेत

देशातील सर्वात मोठे कार डिझायनर आणि डीसी डिझाइनचे संस्थापक दिलीप छाब्रिया यांना सोमवारी रात्री एका फसवणुकीच्या प्रकरणात अटक करण्यात आली. मंगळवारी त्यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर केले जाईल. मुंबई पोलिस त्यांच्या कोठडीची मागणी करू शकतात. छाब्रिया यांची एक लक्झरी कारही ताब्यात घेण्यात आली आहे. अटकेनंतर त्यांना रात्रभर मुंबई पोलिस मुख्यालयात ठेवण्यात आले. वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे.

दिलीप छाब्रियाविरोधात कलम 420, 465, 467, 468, 471, 120 (बी) आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुंबई पोलिस या संदर्भात पत्रकार परिषद घेतील आणि अधिक तपशीलाचा खुलासा करतील.

पोलिसांनी छाब्रियासोबत ही कार देखील जप्त केली आहे
पोलिसांनी छाब्रियासोबत ही कार देखील जप्त केली आहे

देशातील पहिली स्पोर्ट्स कार बनवली

छाब्रिया यांनी भारतातील पहिला स्पोर्ट्स कार देखील डिझाईन केली होती. त्यांनी कारपासून लक्झरी बसपर्यंत सर्वकाही डिझाईन केले आहे. अमिताभ बच्चनपासून शाहरुख खानपर्यंत अनेक चित्रपट कलाकारांच्या कार डिझाईन केल्या आहेत. छाब्रिया कारसोबत सेलिब्रिटींच्या आलिशान व्हॅनिटी व्हॅनदेखील डिझाइन करतात. दिलीप छाब्रियाने डिझाइन केलेल्या मोटारी आणि व्हॅनिटी व्हॅनची किंमत कोट्यावधी पर्यंत आहे.

दिलीप यांचे अनेक शहरांमध्ये डिझाइन स्टुडिओ

त्यांच्या क्लायंट लिस्टमध्ये कॉमेडियन कपिल शर्मा, माधुरी दीक्षित, हृतिक रोशन सारख्या स्टार्सचा समावेश आहे. त्यांनी केवळ कार आणि व्हॅनिटी व्हॅनच नाही तर दुचाकीही डिझाइन केल्या आहेत. बॉलिवूड चित्रपट टारझन द वंडर कारमधील ती कार देखील यांनीच डिझाइन केली होती. दिलीप छाब्रियांचे अनेक मोठ्या शहरांमध्ये डिझाइन स्टुडिओ आहेत.

बातम्या आणखी आहेत...