आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबई क्राईम ब्रँच खंडणीच्या प्रकरणात परमबीर सिंह यांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनची चौकशी करीत आहे. दरम्यान, या प्रकरणात गुन्हे शाखेने फरार गुंड छोटा शकीलचा भाऊ अन्वरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच इतर दोन जणांवर वसुलीच्या वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परमबीर सिंह यांच्या वसूली प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी केली जात आहे. एसआयटीच्या हाती फरार गुंड छोटा शकील यांचा एका ऑडिओ लागलेला आहे. या ऑडिओमध्ये शकील एका बिल्डरला धमकी देत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी या प्रकरणात दोन लोकांना अटक करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा ऑडिओ समोर आल्यानंतर अन्वरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5 वर्षापूर्वीची ऑडिओ क्लीप
ही ऑडिओ क्लीप 2016 तील असून परमबीर सिंह त्यावेळी ठाणे पोलिस आयुक्त होते. या ऑडिओमध्ये छोटा शकील संजय पुनमिया नावाच्या बिल्डरला धमकी देताना दिसत आहे. दरम्यान, शकील संजयला दुसरा बिल्डर श्याम सुंदर अग्रवालसोबत सेटलमेंट करायला सांगतो.
श्याम सुंदर यांनी परमबीर गुन्हा दाखल केला होता
बिल्डर शाम सुंदर अग्रवाल यांनी परमबीर सिंग यांच्यासह 6 पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध वसुलीचा गुन्हा दाखल केला आहे. सदरील प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी केल्या जात आहे. परमबीर सिंग यांनी त्यांना बनावट प्रकरणात गोवले असून त्यांच्याविरोधात MCOCA अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याचे श्याम सुंदर अग्रवाल यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. परमबीर सिंग आणि त्यांच्या काही सहकारी पोलिसांनी त्यांना जीवे मारण्याची धमकीच दिली नाहीतर त्यांना सुरक्षा पुरवण्याच्या नावाखाली पैसेही उकळले असल्याचा आरोप श्याम सुंदर यांनी केला.
परमबीर यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी
मुंबईचे बांधकाम व्यावसायिक केतन तन्ना यांनी अशाच एका प्रकरणात परमबीर सिंग यांच्यासह 28 लोकांविरुद्ध खंडणीसाठी एफआयआर दाखल केला होता. ठाणे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अनेक वेळा फोन करूनही सिंह त्यांच्यासमोर चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यानंतर ठाणे पोलिसांनी शुक्रवारी परमबीरविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.