आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:अनिल देशमुखांची 8 तास चौकशी, राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी आरोप, सीबीआयसमोर जबाब

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सांताक्रुझ येथील डीआरडीओ गेस्ट हाऊसवर चाैकशीसाठी पाचारण करण्यात आले होते.

एपीआय सचिन वाझे याला दरमहा १०० कोटींची वसुली करण्यास सांगितल्याप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची बुधवारी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ८ तास चौकशी केली. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या आरोपाप्रकरणी दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चाैकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अनिल देशमुखांना सोमवारी सीबीआयने समन्स बजावले होते. त्यांना बुधवारी सांताक्रुझ येथील डीआरडीअो गेस्ट हाऊसवर चाैकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. दिल्लीहून आलेले सीबीआयचे पथक या ठिकाणी उतरले असून सकाळी १० वाजता देशमुख गेस्ट हाऊसवर पोहोचले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्यांचा जाबजबाबाचे काम संपले. पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने माजी गृहमंत्र्यांची आठ तास चौकशी केली असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ६ वाजता जबाब नोंदवून घेण्याचे काम संपले तरीही देशमुख गेस्ट हाऊसमध्येच होते. दरम्यान, त्यांना गुरुवारी पुन्हा बोलावले आहे अथवा कसे याबाबत माहिती कळू शकली नाही.

काय सांगितले देशमुखांनी
राज्य सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी परमबीर यांनी हे आरोप केले आहेत. १०० कोटी वसुलीचे प्रकरण धादांत खोटे असल्याचे सांगून देशमुखांनी सर्व आरोप फेटाळल्याचे सीबीआय सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...