आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पालघर मॉब लिंचिंग प्रकरणात CBI ने 4 अल्पवयीनसह 19 लोकांना अटक केली आहे. गुरुवारी हजर झाल्यानंतर कोर्टाने या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणात आतापर्यंत 248 लोकांना अटक करण्यात आली आहे. त्याच बरोबर 105 लोकांना जामीन मंजूर झाला आहे. पालघरमध्ये 19 एप्रिल रोजी रात्री दोन साधू आणि एक ड्रायव्हरला मारहाण करण्यात आली होती.
अशी झाली होती साधूंची हत्या
पालघरच्या गडचिंचले गावात 16 एप्रिलला दोन साधु आणि त्यांच्या ड्रायव्हरला जमावाने चोर असल्याच्या संशयाने मारहाण केली होती. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. ते सूरतला जात होते. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात जवळपास 154 लोकांना अटक करण्यात आली आणि 11 अल्पवयीन मुलांना अटक केली. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र सीआयला सोपवण्यात आला होता. ज्यांनी न्यायालयात तीन आरोपपत्र दाखल केले आहेत. सरकारने पालघर जिल्हा पोलिस प्रमुख गौरव सिंह यांनाही रजेवर पाठवले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.