आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 कोटी वसुली प्रकरण:माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे पाय खोलात, सीबीआयकडून मुंबई, पुण्यासह 12 ठिकाणांवर छापेमारी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती अनिल देशमुखांची याचिका

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसत आहे. सरकारी तपास यंत्रणा दिवसेंदिवस त्यांची अधिक चौकशी करत असल्याचे दिसत आहे. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी सीबीआयकडून अनिल देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या 12 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे.

सीबीआयने अनिल देशमुख यांच्या संबंधातील मुंबई, पुणे, नाशिक, सांगली व अहमदनगर येथील ठिकाणांवर छापेमारी केली आहे. तर,अहमदनगर आणि मुंबईमध्ये डीसीपी राजू भुजबळ यांच्या घरी आणि पुणे, मुंबईत एसीपी संजय पाटील यांच्या निवासस्थानी छापेमारी सीबीआयने केली.

सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती अनिल देशमुखांची याचिका
माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकार या दोघांच्याही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी देशमुखांनी याचिका केली होती ही फेटाळण्यात आली आहे. तर अनिल देशमुख प्रकरणामध्ये दाखल गुन्ह्यातील दोन मुद्दे वगळावे या मागणीसाठी राज्य सरकारकडून याचिका करण्यात आली होती ती देखील उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

अनिल देशमुख यांनी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यावरच आक्षेप घेतलेला होता. यासोबतच महाराष्ट्र सरकारने त्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्या, यासोबतच सचिन वाझे यांच्याबाबतच्या उल्लेखावर आक्षेप घेतला होता. हा भाग एफआयआरमधून वगळण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयालाकडे केली होती. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमधल्या दोन परिच्छेदांमध्ये यासंदर्भातले उल्लेख करण्यात आले होते. मात्र, न्यायालयाने या दोन्ही याचिका फेटाळून लावल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...