आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकार हत्याकांड​​​​​​​:CBI कोर्टाकडून डॉन छोटा राजनची सुटका, तपास यंत्रणेला सापडला नाही कोणताच पुरावा

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विशेष सीबीआय कोर्टाने सोमवारी पत्रकार हत्याकांड प्रकरणात गँगस्टर छोटा राजनची निर्दोष मुक्तता केली आहे. तपास यंत्रणेने न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केली. राजनला 1997 मध्ये एका पत्रकाराच्या हत्येतील आरोपी ठरवण्यात आले होते. न्यायाधीश ए टी वानखेडे यांनी राजनविरोधात कोणतेही पुरावे नसल्यामुळे त्याची सुटका केली.

तपासात सीबीआयला मिळाले नाहीत पुरावे

12 जून 1997 ला मुंबईत राहणाऱ्या क्राइम रिपोर्टर बलजीत शेरसिंग परमार एंटाप हिल परिसरात हल्लेखोरांच्या हल्यात जखमी झाले होते. या हल्ल्यामागे छोटा राजनचा हात असल्याचा आरोप त्याच्यावर होता. सुरुवातीला हे प्रकरण मुंबई पोलिसांकडे होते, नंतर सीबीआयने हे प्रकरण आपल्या हाती घेतले. सीबीआयला या प्रकरणात छोटा राजनविरोधात कोणतेही पुरावे मिळाले नाही.

दिल्लीतील तिहार तुरुंगात बंद आहे राजन

राजनवर विविध प्रकरणात गुन्हा दाखल आहेत. सध्या तो दिल्लीतील तिहार तुरुंगात कैद आहे. ऑक्टोबर 2015 मध्ये इंडोनेशियाकडून प्रत्यार्पन झाल्यापासून तो तुरुंगात आहे. राजन महाराष्ट्रात 70 प्रकरणात आरोपी आहे, यात 2011 मध्ये पत्रकार जे डे हत्या प्रकरण सामील आहे.

बातम्या आणखी आहेत...