आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

विमानतळ घोटाळा:मुंबई विमानतळ विकासात 705 कोटींच्या घोटाळा प्रकरणी जीव्हीके ग्रुपच्या चेअरमनसह मुलाच्या विरोधात खटला; सीबीआयची कारवाई

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जीव्हीके ग्रुपचे चेअरमन जी व्यंकट कृष्णा (जीव्हीके) रेड्डी आणि त्यांचा मुलगा जीव्ही संजय रेड्डी यांच्या विरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकास कामात 705 कोटी रुपयांचा अपहार केल्याच्या आरोप प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या काही अधिकाऱ्यांसह, एमआयएल, जीव्हीके एअरपोर्ट होल्डिंग्स आणि इतर 9 कंपन्यांचा समावेश आहे. 

जीव्हीके एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) आणि काही परदेशी कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एमआयएएल) नावाची कंपनी बनवण्यात आली होती. याचे 50.5% शेअर जीव्हीकेकडे, 26% एएआयकडे आहेत. जीव्हीके रेड्डी जॉइंट व्हेंचरचे चेअरमन आणि जीव्ही संजय रेड्डी एमडी आहेत.

एफआयआरमध्ये लिहिलेल्या माहितीनुसार, 2012 ते 2018 दरम्यान मुंबई विमानतळ विकासाच्या नावे घोटाळा करण्यात आला. जीव्हीके ग्रुपने एमआयएएलच्या सरप्लस फंडमधून 395 कोटी रुपये आपल्या दुसऱ्या एका कंपनीत लावले. एमआयएएल मुंबईत असतानाही सरप्लस फंड हैदराबादच्या बँकांमध्ये ठेवण्यात आले. या अपहारासाठी बोर्ड मीटिंगचा बनावट प्रस्ताव तयार करण्यात आला होता. दुसरीकडे, बनावट करार दाखवून 310 कोटी रुपयांचा फेरफार करण्यात आला.

0