आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे:महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी करण्याचं 'उदात्त' कार्य केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना 'साष्टांग दंडवत' - रोहित पवार

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपाने राज्याचा नावलौकिक घालवण्याचंच काम केलं, 'अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही.'

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास आता सीबीआय करणार आहे. सुप्रीम कोर्टाने बुधवारी हा निर्णय दिला. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावं, अशा सूचनाही न्यायालयाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे.

सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नसल्याचं न्यायालयानेच स्पष्ट केलं हे बरं झालं. पण यानिमित्ताने बिहारची राजकीय पोळी भाजण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी करण्याचं 'उदात्त' कार्य केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना 'साष्टांग दंडवत'. असं म्हणत रोहित पवार यांनी भाजपावर हल्लाबोल केला.

यासोबतच “आधी ‘कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’ आणि राज्यातील सत्ता गमावल्यानंतर ‘मेरा अंगण मेरा रणांगण’ या घोषणेतून तर आता सुशांत सिंह प्रकरणातून भाजपाने राज्याचा नावलौकिक घालवण्याचंच काम केलं. अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही,” अस म्हणत त्यांनी भाजपला लक्ष्य केले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला. या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, सीबीआय तपासाला महाराष्ट्र सरकार आव्हान देऊ शकणार नाही. पाटण्यात दाखल करण्यात आलेला एफआयआर सर्वसमावेश असल्याचे सांगून न्यायालयाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे.

सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिने पाटण्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून केली होती. त्यावर आज न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या 35 पानांच्या आदेशातील 5 मोठ्या गोष्टी

आता पुढे काय?

  • बिहार पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर बरोबर होती.
  • सीबीआय चौकशीचीही कायद्यानुसार शिफारस केली गेली.
  • मुंबई पोलिसांनी तपासात सहकार्य करावे, त्यांनी गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवावेत.
  • पुढील कोणतीही एफआयआर नोंदविल्यास सीबीआय त्याची चौकशी देखील करेल.
  • सुशांत एक प्रतिभावान अभिनेता होता. बरेच लोक निकालाची वाट पाहत आहेत, जेणेकरून तर्कांना पूर्णविराम लागेल. म्हणून, निष्पक्ष आणि प्रभावी तपास होणे आवश्यक आहे.
बातम्या आणखी आहेत...