आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 कोटी वसुली प्रकरण:अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर सीबीआयचा छापा, त्यांच्या मुलाविरुद्ध अटक वॉरंट जारी

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

100 कोटी वसुली प्रकरणात सीबीआयने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील काही ठिकाणी छापे टाकले आहेत. सीबीआयने एप्रिलमध्ये अनिल देशमुख यांच्या घरावर आधीच छापा टाकला आहे. हे देखील समोर येत आहे की, अनिल देशमुख यांचा मुलगा हृषीकेश देशमुख याच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. सीबीआयच्या 5 सदस्यांची टीम अनिल देशमुख यांच्या घरी आणि काही कार्यालयांवर कारवाई करत आहे.

अनिल देशमुख अनेक दिवसांपासून बेपत्ता होते. दोन आठवड्यांपूर्वी ते सार्वजनिकरित्या दिसले होते. केंद्रीय तपास यंत्रणेने यापूर्वीच देशमुख यांचे दोन खाजगी सचिव कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांची याच प्रकरणात 10 तास चौकशी केली आहे. या दोघांनाही ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. याशिवाय अँटिलिया प्रकरणात अटक केलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सचिन वझे यांची चौकशी करण्यात आली आहे. ईडीने देशमुख यांना 5 वेळा चौकशीसाठी समन्सही बजावले आहे. असे असूनही ते हजर झाले नाहीत.

100 कोटींच्या वसुलीचे प्रकरण अशाप्रकारे सीबीआयच्या हाती आले
एप्रिल महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सीबीआयला आरोपांची चौकशी करून 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. पहिल्या 15 दिवसांत, सीबीआयने कोविडचा हवाला देत अहवाल सादर केला नाही, परंतु नंतर देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्यांच्या 10 ठिकाणी छापे टाकले.

बातम्या आणखी आहेत...