आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • CBI Team Goes To Sushant's House And Recreates The Incident; Cook's Interrogation, Claiming To Have Taken An Unknown Person Into Custody

सुशांतसिंह राजपूत प्रकरण:सीबीआय टीमने सुशांतच्या घरीजाऊन केले घटनेचे ‘रिक्रिएशन’; कुकची चौकशी, एका अज्ञाताला ताब्यात घेतल्याचा दावा

मुंबई/पाटणाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ईडीकडून सुशांतची बहीण प्रियंकाची हिचीही चौकशी

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत दाखल झालेल्या सीबीआय अधिकाऱ्यांच्या एका टीमने शुक्रवारी सुशांतच्या वांद्र्यातील फ्लॅटवर जाऊन १४ जूनच्या घटनेचे रिक्रिएशन केले. नूपुर प्रसाद यांच्या नेतृत्वातील सीबीआयच्या दुसऱ्या टीमने वांद्रे पोलिस ठाण्यात जाऊन केस डायरी आणि आवश्यक कागदपत्रे ताब्यात घेतली. यात शवविच्छेदन व फोरेन्सिक अहवालाचाही समावेश आहे. सीबीआयने सुशांतची डायरी, लॅपटॉप आणि मोबाइलही ताब्यात घेतला. सीबीआयच्या अाणखी एका टीमने सुशांतचा कुक नीरजची गेस्ट हाऊसमध्ये चौकशी केली. सुशांतचे कर्मचारी दीपेश सावंत आणि इतर साक्षीदारांचीही चौकशी केली. मुंबई आणि बिहार पोलिसांनीही नीरजची चौकशी केलेली आहे. त्याने सांगितले की घटनेच्या दिवशी त्याने सुशांतला ज्यूस दिले होते. सीबीआयने एका अज्ञात व्यक्तीलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

सूत्रांनुसार, सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सर्वात आधी घटनास्थळी पोहोचलेल्या मुंबई पोलिसांच्या टीमचीही चौकशी केली आहे. मुंबई पोलिस अधिकारी, इतर सदस्य आणि सुशांतसिंहच्या मित्रांचीही चौकशी केली जाणार आहे. इतकेच नव्हे तर मुंबई पोलिसांनी आधी ज्या संशयितांची चौकशी केली होती, त्यांचीही पुन्हा चौकशी केली जाईल. सीबीआयचे अधिकारी मुंबईत १० दिवस तळ ठोकून बसणार असल्याचेही म्हटले जात आहे. सीबीआय सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करणार आहे.

ईडीकडून सुशांतची बहीण प्रियंकाची हिचीही चौकशी

सुशांतशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणाची चौकशी करत असलेल्या ईडीने शुक्रवारी त्याची बहीण प्रियंकाची चाैकशी केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनुसार, सुशांतच्या बँक खात्यांतील व्यवहारांबाबत प्रियंकाला प्रश्न विचारण्यात आले. ईडीने मंगळवारी सुशांतचे वडील के.के. सिंह आणि गुरुवारी चित्रपट निर्माते रुमी जाफरी यांचे जबाब घेतले होते. याआधी ईडीने रिया, तिचा भाऊ शोविक, वडील इंद्रजित, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, त्याची माजी मॅनेजर श्रुती मोदी, त्याचा खासगी स्टाफ रितेश मेवाती आणि दीपेश सावंत, सुशांतची बहीण मीतू सिंह, त्याचा सीए संदीप श्रीधर आणि रियाचा सीए रितेश शाह यांचीही चौकशी केलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...