आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर, तपासासाठी मुंबईत येणाऱ्या सीबीआयच्या पथकास बीएमसी क्वारंटाइन करणार नाही. कोर्टाने बुधवारी रिया चक्रवतीची याचिका फेटाळत हे प्रकरण सीबीआयकडे दिले होते. रियाने पाटण्यात दाखल खटला मुंबईत हस्तांतरित मागणी केली होती. सुशांतच्या वडिलांनी तिच्याविरूद्ध फसवणूक आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
बीएमसीचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले की, सीबीआय पथक सात दिवसांसाठी येत असेल तर त्यांना क्वारंटाइन करण्यात येणार नाही. मात्र जर ते सात दिवसांपेक्षा जास्त काळासाठी येत असतील तर त्यांना ईमेलद्वारे सूट मिळण्यासाठी अर्ज करावा लागेल. याबद्दल परिपत्रक काय आहे हे सर्वांना माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सीबीआयची टीम गुरुवार किंवा शुक्रवारपर्यंत मुंबई दाखल होऊ शकते.
10 लोकांची टीम मुंबईत येत आहे
सीबीआयने या प्रकरणासाठी गुजरात कॅडरचे आयपीएस मनोज शशिधर यांच्या नेतृत्वात एसआयटी गठीत केली आहे. गुजरात कॅडरच्या महिला आयपीएस अधिकारी गगनदीप गंभीर देखील या पथकात आहेत. त्या दिल्ली सीबीआय मुख्यालयात कार्यरत आहेत. यांसह एकूण 10 जणांची टीम मुंबईत येत आहे.
बिहार पोलिसच्या एसपीला का केले होते क्वारंटाइन
बीएमसीने दिलेले हे विधान महत्वाचे आहे, कारण अलिकडचे जेव्हा पाटणाचे एसपी विनय तिवारी प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत आले, तेव्हा त्यांना क्वारंटाइन केले होते. या निर्णयानंतर बीएमसीवर टीका केली होती.
दोन पोलिसांचीही चौकशी केली जाऊ शकते
एसआयटी प्रकरणात सीबीआय मुंबईच्या दोन उच्च पोलिसांचीही चौकशी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या अधिकाऱ्यांपैकी एकजण या प्रकरणातील मुख्य संशयिताशी सतत संपर्कात होता, असा आरोप केला जात आहे. तर दुसरीकडे अन्य अधिकाऱ्याने सुशांतच्या मेव्हण्याच्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहिले नव्हते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.