आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज घोटाळाप्रकरण:कोचर यांच्या अटकेविरोधातील याचिकेवर सीबीआय उत्तर देणार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्ज घोटाळाप्रकरणी आयसीआयसीआयच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांच्या अटकेविरोधातील याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी सीबीआयला शुक्रवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सीबीआयला शुक्रवारपर्यंत वेळ दिला आहे. कोचर दाम्पत्याने त्यांच्या अटकेला “बेकायदेशीर” ठरवून रिमांडचा आदेश रद्द करण्याची मागणी करत हायकोर्टात धाव घेतली आहे. तुरुंगातून सुटका करून घेण्यासाठी, त्यांनी या महिन्याच्या शेवटी त्यांच्या मुलाचे लग्न आहे आणि पाहुण्यांना आधीच आमंत्रणे पाठवली गेली आहेत, असे सांगितले. सीबीआयने २३ डिसेंबर रोजी चंदा आणि दीपक कोचर यांना अटक केली होती. त्यानंतर या दांपत्याला न्यायालयीन कोठडी सुनावली गेली

बातम्या आणखी आहेत...