आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'त्या' सोशल मीडिया पोस्ट्सची चौकशी:सेलिब्रिटींच्या 'टिवटिव'ची चौकशी होणार; काँग्रेस नेत्यांच्या मागणीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले चौकशीचे आदेश

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सेलिब्रिटींचे ट्विट एकसारखेच असल्याने होणार चौकशी
  • ट्विट करण्यामागे कुणाचा दबाव होता याचा करणार तपास

सेलिब्रिटींनी नुकतेच इंटरनॅशनल गायिका रिहानाच्या सोशल मीडिया पोस्टनंतर केलेल्या ट्विटरवरील पोस्ट्सची महाराष्ट्रात चौकशी होणार आहे. काँग्रेस नेत्यांच्या मागणीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी त्यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केले आहेत. या सर्वांनी केलेल्या पोस्ट बहुतांशी एकसारख्याच जणू कॉपी पेस्टच होत्या. या पोस्ट त्यांनी कुणाच्या दबावाखाली येऊन केल्या त्याचा तपास केला जाणार आहे.

कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवरून शेतकऱ्यांनी देशभर त्यातही प्रामुख्याने दिल्ली सीमांवर आंदोलन सुरू केले. त्याच आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर रिहानाने सोशल मीडियावरून समर्थन दर्शवले होते. आपण यावर चर्चा करत नाही असा सवाल तिने केला होता. तिच्यासोबतच, पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गने सुद्धा भारतातील आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा जाहीर केला. इतर आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी सुद्धा तिचे समर्थन केले. पण, आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी भारतातील आंदोलनांवर प्रतिक्रिया देणे म्हणजे त्यांनी भारताच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप करणे असल्याचे काही सेलिब्रिटींचे म्हणणे आहे.

माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर, अभिनेता अक्षय कुमार, गायिका लता मंगेशकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी रिहाना आणि आंतरराष्ट्रीय व्यक्तींच्या प्रतिक्रियांवर रोष व्यक्त करून सोशल मीडिया पोस्ट केल्या. त्या सर्वांच्या सोशल मीडिया पोस्ट कॉपी पेस्ट वाटण्याइतपत एकसारख्या होत्या. त्यांनी कुणाच्या दबावाखाली या पोस्ट केल्या असतील याचा आता महाराष्ट्राचे गुप्तचर विभाग तपास करणार आहे. पण, या चौकशीतून काय साध्य होणार किंवा दोषी आढळल्यास सेलिब्रिटींवर कोणत्या स्वरुपाची कारवाई होणार हे अजून स्पष्ट नाही.

बातम्या आणखी आहेत...