आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

CBSE 12वीचे निकाल:तिरुवनंतपुरमच्या विद्यार्थ्यांची बाजी, 97.67% निकाल: सीबीएसई बारावीचा निकाल ऑनलाइन पाहण्यासाठी cbseresults.nic.in वर करा क्लिक

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रद्द झालेल्या पेपरच्या मूल्यांकनासाठी असेसमेंट स्कीम

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एजुकेशन (CBSE) ने सोमवारी दुपारी 12 वीचे निकाल जाहीर केले आहेत. विद्यार्थ्यांना आपले निकाल अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर पाहता येतील. यासोबतच उमंग मोबाईल अॅपच्या माध्यमातून सुद्धा निकाल पाहू शकता. निकाल जाहीर करण्यापूर्वी बोर्डाने कुठलीही पूर्वसूचना दिली नाही. गतवर्षी निकाल 2 मे रोजी जाहीर करण्यात आले होते. परंतु, कोरोना आणि लॉकडाउनमुळे निकाल जाहीर होण्यासाठी विद्यार्थ्यांना जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागली.

सुप्रीम कोर्टाने निर्णयानंतर सीबीएसईने 1 ते 15 जुलै दरम्यान होणाऱ्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. तसेच असेसमेंट स्कीम अंतर्गत निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. बोर्डाच्या परीक्षांवर सुनावणी घेताना सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की 10 वी आणि 12 वीचे निकाल 15 जुलै रोजी जारी करावे. यानंतरच बोर्डाने हा निर्णय घेतला.

या वेबसाइटवर पाहा निकाल

http://cbseresults.nic.in

http://results.gov.in

डिजिटल असणार मार्कशीट

विद्यार्थ्यांना डिजिलॉकरटच्या माध्यमातून डिजिटल मार्कशीट दिली जाणार आहे. डिजिलॉकरने मार्कशीट डाउनलोड करण्यासाठी digilocker.gov.in यावर जावे लागेल. बोर्डाकडून विद्यार्थ्यांना डिजिलॉकर क्रिडेंशियल्स (लॉग इनची माहिती) एसएमसएसच्या माध्यमातून दिले जातील. याचाच वापर करून डिजिटल गुणपत्रिका डाउनलोड करता येईल.

रद्द झालेल्या पेपरच्या मूल्यांकनासाठी असेसमेंट स्कीम

CBSE ने 10वी आणि 12 वीच्या रद्द झालेल्या पेपरचे मूल्यांकन करण्यासाठी असेसमेंट स्कीम आधीच लागू केली. बोर्डाने यासंदर्भात अधिकृत वेबसाइटवर माहिती जारी केली होती. बोर्डाच्या नवीन असेसमेंट स्कीमनुसार, जारी करण्यात आलेले नियम CBSE च्या अधिकृत वेबसाइट  https://www.cisce.org वर पाहता येतील.

0