आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

विशेष रेल्वे गाड्या:केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार लोकल प्रवासाची परवानगी, आशिष शेलार यांनी ट्विट करत दिली माहिती

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे देशभरातील रेल्वे सेवा सध्या बंद आहे. केवळ अत्यावश्यक सुविधा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येत आहेत. दरम्यान आता केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही मुंबईतील लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मध्य रेल्वेने तसे एक पत्रक जारी केले आहे. यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करता येणार आहे.

भाजप नेते, आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विनंती केल्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यावर आज अंतिम निर्णय जाहीर केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यासोबतच शेलार यांनी शहा आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांचे आभारही मानले आहेत.

0