आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:सीईटी घेता येते, वार्षिक परीक्षा का नाही? इयत्ता दहावी परीक्षेचा वाद पोहोचला मुंबई उच्च न्यायालयात

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इयत्ता दहावीची यंदाची परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला पुण्यातील धनंजय कुलकर्णी यांनी जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले असून यासंदर्भातील प्राथमिक सुनावणी सोमवारी होण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. राज्य सरकार यंदा अंतर्गत मूल्यमापनावरून दहावीच्या विद्यार्थ्यांना गुण देणार आहे. अकरावी प्रवेशासाठी परीक्षा घेता येत असेल तर दहावीच्या परीक्षा सरकारला का घेता येत नाहीत, असा आक्षेप या जनहित याचिकेत घेण्यात आला आहे.

‘एसएससी, आयसीएसई, सीबीएसई अशा वेगवेगळ्या बोर्डांनी विद्यार्थ्यांचे दहावीचे निकाल वेगवेगळ्या सूत्रांनी लावले तर आणखी गोंधळ वाढेल. पदविकांच्या विविध कोर्सच्या प्रवेशातही गोंधळ होईल. एसएससी बोर्डाने इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटीची घोषणा केली आहे. मग इयत्ता दहावीची परीक्षा घेणेही शक्य आहे. याप्रश्नी न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशा विनंती याचिकेत करण्यात आल्याचे अॅड. उदय वारुंजीकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...