आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी:CET परीक्षांच्या तारखा जाहीर, उदय सामंतांची ट्विटवरुन घोषणा, ऑनलाईन नोंदणीला सुरुवात

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.

शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा 3 जून ते 10 जूनला होणार आहे.

तंत्र शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा 11 जून ते 28 जून तसेच कला शिक्षण विभागाची सीईटी परीक्षा 12 जूनला घेण्यात येणार आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले. नमूद कालावधीत अर्ज सादर करुन परीक्षा द्यावी, असे आवाहन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून करण्यात आले.

या अभ्यासक्रमांसाठी सीईटी प्रक्रिया जाहीर

तंत्रशिक्षणांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे ऑनलाईन अर्ज नोंदणी 10 फेब्रुवारी ते 15 एप्रिलपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच संबंधीत सामाईक प्रवेश परीक्षा 11 जून ते 28 जून या कालावधीत घेण्यात येऊ शकतात. कला शिक्षण विभागांतर्गत घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षा 12 जूनला घेण्यात येणार आहे.

याकडे द्या लक्ष

  • राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षांचे ऑनलाईन नोंदणी अर्ज स्वीकृती सुरु केली.
  • अभ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षांचे माहिती पुस्तिका, वेळापत्रक आणि अभ्यासक्रम राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर www.mahacet.org उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
  • उच्च शिक्षण विभागाचे विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षाचे ऑनलाईन अर्ज नोंदणी 19 मार्च ते 12 एप्रिलपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
  • सीईटी परीक्षा 3 जून ते 10 जून या कालावधीत घेण्यात येऊ शकतात.
बातम्या आणखी आहेत...