आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणावरुन राजकारण तापलेले असल्याचे पहायला मिळत होते. आता यानंतर राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या आरक्षणासंदर्भात राज्यातील ओबीसी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. यासंदर्भात भाजपची बैठक झाली. या बैठकीनंतर येत्या 26 जून रोजी ओबीसी आरक्षणासाठी राज्यात एक हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा पंकजा मुंडेंनी केली आहे.
ओबीसी आरक्षणासंदर्भात आज भाजपची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत पत्रकारपरिषद घेत येत्या 26 जूनपासून आंदोलन केले जाणार असल्याची माहिती दिली. तसेच महाविकास आघाडीच्या चुकीमुळे ओबीसींचे आरक्षण गेले आहे. राज्य सरकारने ओबीसींचे राजकारण संपवले असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यामुळेच या सरकारला धडा शिकवण्यासाठी आम्ही येत्या 26 जून रोजी चक्काजाम आंदोलन करणार असल्याची माहिती पंकजा मुंडे म्हणाल्या.
यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 'पंकजा मुंडेंनी सांगितलेलं खरे आहे, आज आम्ही सर्व ओबीसी नेते या निकषावर आलो आहोत, की या महाराष्ट्र सरकारला ओबीसींचे आरक्षण द्यायचे नाही. यामुळेच 26 जून रोजी महाराष्ट्रामध्ये एक हजार ठिकाणी भाजपकडून आंदोलने केली जाणार आहे. गरज पडली तर आम्ही सर्वजण पुन्हा न्यायालयात जाऊन तसेच या सरकारला ओबीसी आरक्षण देण्यासाठी भाग पाडू असेही ते म्हणाले आहेत. तसेच या सरकारने ओबीसींवर अन्याय केलेला आहे. आता हे सरकार नौटंकी करत आहेत. या सर्वाचा आम्ही निषेध करतो. आम्ही रस्त्यावर उतरू, न्यायालयात जाऊ पण ओबीसी आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.