आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाने आता चांगलाच जोर धरला:येत्या 8 दिवसांत सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता

मुंबई6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या महिन्यापासून राज्यात सक्रिय झालेल्या पावसाने आता चांगलाच जोर धरला असून येत्या आठ दिवसांत राज्यात जवळपास सर्वच भागांत दमदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी पावसामुळे मोठे नुकसान झाले असून पावसाशी संबंधित विविध घटनांत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या दोनशेच्या वर गेली आहे. शेतकऱ्यांनाही मोठा बसला आहे. राज्यात सर्वच भागात पुढील आठ दिवस पाऊस चांगला जोर धरणार आहे. रायगड, रत्नागिरी,कोल्हापूर, नाशिक, पुणे, सातारा घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

६ ते १८ दरम्यान जोरदार परभणी - मराठवाड्यात ६ ते १८ ऑगस्टदरम्यान मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता मुंबई हवामान केंद्राने वर्तवली. ६ रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद, ७ रोजी नांदेड, हिंगोली, परभणी, ८ रोजी औरंगाबाद, जालन्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.

बातम्या आणखी आहेत...