आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचा अंदाज:छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगावात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता, काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळ

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, पुणे आणि जालन्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने यांनी ४ ते ७ मार्चसाठी हा इशारा दिला आहे. त्यानुसार, पुढील ४-५ दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी, हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, ३ मार्चला अकोला जिल्हा राज्यात सर्वाधिक उष्ण ठरला. येथे पारा ३.० अंशांनी वाढल्याने कमाल तापमान ३८.२ अंश नाेंदवण्यात आले. ३१ मार्च २००७ रोजी अकोला जिल्ह्यात सर्वाधिक ४३.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती.

बातम्या आणखी आहेत...