आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान:राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये पुन्हा एकदा मान्सून हजेरी लावण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या चार दिवसांमध्ये राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे महाराष्ट्रातल्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागीरी, रायगड जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरीत भागात अद्याप तरी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली नाही.

उद्यापासून पुढील चार दिवस पुण्यात हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या पिकाची अपेक्षा होती. मात्र, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले.

बातम्या आणखी आहेत...