आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचं ठरलं:5 ऑगस्टला शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता, 15 मंत्री शपथ घेऊ शकतात

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. पण, महिना उलटला तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झाले नाही. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? असा सवाल रोज विरोधकांकडून विचारण्यात येत आहे. यातच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात 5 ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 मंत्री शपथ घेऊ शकतात. भाजप गटातील 8 आणि एकनाथ शिंदे गटातील 7 मंत्री शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे सरकारला एक महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झाला, मात्र सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सर्व कामकाज पाहत आहेत. दोघे जण सर्व कारभार पाहत असल्याने एक दुजे के लिए असाच यांचा कार्यक्रम दोघांचा चाललेला आहे, अशी ही टीका विरोधकांनी केली आहे.

शिंदे यांनी 30 जून रोजी महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. शिंदे सरकारने मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचे 751 सरकारी आदेश जारी केले असून त्यापैकी 100 हून अधिक आदेश हे एकट्या आरोग्य विभागाशी संबंधित आहेत.

यांना मंत्रीपदे मिळण्याची शक्यता

  • भाजप

गुजरातमध्ये पहिल्यावेळेस निवडून आलेल्या आमदारांना मंत्रिपदे देण्यात आल्याने तसे झाले तर देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, संजय कुटे, विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय, डॉ. रणजित पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, प्रा.राम शिंदे, मेघना बोर्डीकर यांची राज्यमंत्रिमंडळात वर्णी लागू शकते. या व्यतिरिक्त चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांना संधी मिळू शकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.

  • शिंदे गट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतून कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, संदीपान भुमरे, राज्यमंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अपक्ष राज्यमंत्री राजेंद्र यड्ड्रावार, आणि बच्चू कडू यांनी मंत्रिपदावर असताना शिंदेंना पाठिंबा दिला. यांच्यासह 5 तारखेला पहिल्या 8 आमदारांमध्ये संजय शिरसाट, यांना देखील संधी मिळणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

कोर्टाच्या निर्णयानंतर विस्तार?

मंत्रिमंडळ विस्तार न केल्याने विरोधक शिंदे यांना सातत्याने टोमणे मारत आहेत. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते. याशिवाय, 3 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी होणार आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर 2 ते 4 दिवसांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय होईल, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर उद्या सुनावणी
सर्वोच्च न्यायालायात शिवसेना, शिंदे गटाच्या भवितव्यावर सर्वोच्च सुनावणी आज पूर्ण होऊ शकली नाही. आता ती उद्यावर ढकलण्यात आली आहे. आज सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान पक्ष फुटीरतेचा बचाव पुरेसा होऊ शकत नाही, असा सवाल कोर्टाने शिंदे गटाला विचारला होता. आज दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद केला गेला. कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी शिवसेनेची बाजू मांडली. तर शिंदे गटाकडून हरिश साळवे तसेच निरज कौल आणि महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. तर राज्याचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनीही कोर्टात राज्यपालांची बाजू मांडली.

आमदारांना अपात्र ठरवल्यास राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळू शकते, असे जाणकार सांगत आहेत. तर सरकारच्या बाजूने निकाल आल्यास येत्या चार दिवसात राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे कौल कुणाच्या बाजूने जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले. उद्याचा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. तर निकालानंतर शिवसेनेचे अस्तित्वावरील प्रश्नावरही उत्तरे मिळणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...