आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी चित्रपट:अमिताभ-रश्मिकाच्या 'गुडबाय’साठी मुंबईतच उभारला जाणार चंदीगडचा सेट

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नुकतेच तापसी पन्नू आणि अनुराग कश्यपव्यतिरिक्त दिग्दर्शक विकास बहल यांच्या येथेही इन्कम टॅक्सची धाड पडली होती. ज्यांच्या येथे धाड पडली त्यांच्या चित्रपटाच्या शूटिंगला उशीर होईल, अशी चर्चा होती मात्र तसे काहील झाले नाही. आधी अनुरागने तापसीसोबत आपल्या ‘दोबारा’ चित्रपटाचे शूटिंग सुरू केले होते आता विकास बहलदेखील आपल्या आगामी ‘गुडबाय’ चित्रपटाचे शूटिंग २९ मार्चपासून सुरू करणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत.

४५ दिवसांच्या शेड्यूलमध्ये पूर्ण होणार शूटिंग
चित्रपटाच्या सूत्रानुसार सध्या या चित्रपटाचे तात्पुरते नाव ‘गुडबाय’ आहे. याचे शूटिंग मुंबईत ४५ दिवसाच्या शेड्यूल मध्ये पूर्ण केले जाईल. याचे शूटिंग अंधेरीच्या चांदीवाली स्टुडिओमध्ये होईल. चित्रपट चंदिगडच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे आणि यासाठी चांदीवली स्टुडिओमध्येच चंडीगडसारखे वातावरण तयार केले जात आहे.

फ्लॅशबॅकमध्ये २० वर्षे मागे जाते कथा
मात्र, अद्याप अमिताभ एकट्या वडिलांच्या भूमिकेत आहेत की, एखादी अभिनेत्रीसुद्धा त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे, याविषयी माहिती समाेर आली नाही. मात्र, ही कथा सध्याच्या युगातील आहे. फ्लॅशबॅकमध्ये २० मागे जाते आणि त्या पिढीचा जगाच्या अपेक्षा,

आकांक्षा आणि दृष्टीकोन कळताे.बापलेकीच्या नात्यावर आधारित कथा
अमिताभ बच्चन यांच्या जवळच्या व्यक्तीनुसार..., चित्रपटात बिग एका निवृत्त अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या पात्राच्या प्राेफेशनवर जास्त फोकस केले नाही, तर रश्मिका मंदाना त्यांच्या मुलीच्या भूमिकेत आहे. प्रोफेशन पेक्षा येथे बाप-लेकीच्या भावनिक कथेवर जास्त फोकस करण्यात आला आहे. त्यासाठी निर्मात्यांनी रश्मिकासोबत एखाद्या हिरोलाही घेतले नाही. अशा प्रकारच्या ‘पीकू’ चित्रपटात अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोणसोबत इरफान खान होते. मात्र या कथेची डिमांड वेगळी होती. हा पूर्णपणे कौटुंबिक चित्रपट आहे.

बातम्या आणखी आहेत...