आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना आमदाराची दादागिरी:चांदीवलीचे आमदार दिलीप लांडेंनी कंत्राटदाराला भररस्त्यात बसवून डोक्यावर टाकला कचरा; व्हिडिओ व्हायरल

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नाल्याची सफाई नीट न केल्याचा आरोप

मुंबईतील शिवसेना आमदाराच्या दादागिरीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या महामारीच्या परिस्थितीत चांदीवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडेंनी केलेले कृत्य अतिशय धक्कादायक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिलीव लांडेंनी एक कंत्राटदाराला पाण्याने भरलेल्या रस्त्यावर बसवले आणि डोक्यावर कचरा टाकला. इतकच नाही, तर या घटनेचा व्हिडिओ काढून व्हायरल केला.

नाल्याची सफाई नीट न केल्याचा आरोप

या घटनेनंतर स्पष्टीकरण देताना लांडेंनी त्या कंत्राटदारावर आपले काम योग्यरित्या न केल्याचा आरोप लावला. तसेच, नाल्याची सफाई नीट न केल्यामुळेच रस्त्यावर पाणी साचल्याचे म्हणाले. मागील काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे मुंबईत रस्त्यांवर प्रचंड पाणी साचत आहे. पाणी साचल्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पण, दिलीप लांडेनी जे कृत्य केले, ते योग्य नसल्याच्या प्रतिक्रीया येत आहेत.

बातम्या आणखी आहेत...