आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रकांत खैरेंचा हल्लाबोल:संतोष बांगर हे नेहमीच वादात असतात, त्यांचे अवैध धंदे उघड करणार

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संतोष बांगर हे ते कोणत्या ना कोणत्या वादात नेहमी असतात. ते अवैध धंद्यातून बांगर पैसे कमावतात. त्यांचे अवैध धंदे आम्ही उघड करणार, अशा शब्दात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी हिंगोलीचे शिंदे समर्थक आमदार संतोष बांगर यांच्यावर टीका केली. आमदार संतोष बांगर यांच्यावर मंत्रालयात प्रवेश करताना पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यावरुन त्यांच्यावर विरोधीनेते टीका करत आहेत.

पुढे ते म्हणाले की, हिंगोलीमधील आमचे कार्यकर्ते आणि पदधिकारी मातोश्रीमध्ये भेटले होते. त्यांनी बांगर यांचे सर्व अवैध धंदे उघड करणार असे सांगितले होते. त्यांचे अवैध धंदे पोलिसांना माहिती आहेत. अशा आमदारांना देवेंद्र फडणवीस आणि संघ परिवार हे सर्व कसे सहन करतात. त्यांना या सर्वांची जाणिव होईल आणि हे सगळे संपेल, असाही टोला त्यांनी लगावला.

रवी राणा आणि बच्चू कडू हा नाद नाटकी आहे. शिंदे गटातील आमदार अस्वस्थ आहेत. मंत्रीपदासाठी वादावादी सुरू आहे. दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणारच नाही. तसेच 40 गद्दार पुन्हा निवडणुन येणार नाहीत, असा दावाही खैरे यांनी केला.

ठाकरे गटाचे नेते व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही संतोष बांगर यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, संजय बांगर आणि वाद हे ठरलेलेच आहे. संतोष बांगरांना मुख्यमंत्री किती वेळा समझ देणार.

संतोष बांगर वादाच्या भोवऱ्यात
आज संतोष बांगर हे गार्डन गेटने मंत्रालयात जात होते. त्यांच्यासोबत दहा-पंधरा कार्यकर्ते होते. मात्र, तेथील पोलिसांना त्यांना रोखले. पास नसल्याने एवढ्या कार्यकर्त्यांना पोलिस आत सोडत नव्हते. शेवटी आमदार बांगर यांनी पोलिसांना शिवीगाळ केली. संतोष बांगर यांनी आपल्यावरील हे आरोप फेटाळून लावलेले आहेत. सीसीटीव्ही चेक करुन सत्य शोधू शकता, अशी भूमिका संतोष बांगर बोलून दाखवली.

बातम्या आणखी आहेत...