आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाविकास आघाडीची आजची सभा ही शेवटची सभा असेल, असे वक्तव्य आमदार नीतेश राणे यांनी केले आहे. यावर चंद्रकांत खैरेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. कोण नीतेश राणे त्याला अक्कल आहे का? असा खोचक सवाल चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला आहे.
आमदार नीतेश राणे उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याबद्दल एकेरी बोलतो, हे सर्व भारतीय जनता पक्षाच्या शिस्तबंध कमिटीला कसे आवडते असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला आहे. नीतेश राणे काहीच कामाचा माणूस नाही, असेही चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे. तर राऊतांच्या विरोधात भुंकण्यासाठी राणेंना ठेवले आहे.
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी कोण नीतेश राणे, त्याला अक्कल आहे का? असा सवाल उपस्थित करत त्यांच्यावर खोचक टीका केली आहे. आमदार नीतेश राणे यांचे वडील काँग्रेस नेतृत्वाचे पाय दाबायचे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
अजित पवार जाणार नाही
चंद्रकांत खैरे म्हणाले की,महाविकास आघाडी शरद पवारांनी तयार केली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, काकांना सोडून अजित पवार कुठेही जाणार नाही, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.अजित पवार कधीच कुठे जाणार नाही. तर भाजपकडून केवळ वातावरणनिर्मिती करत असल्यसाचेही त्यांनी म्हटले आहे.
राणेंनी सोनिया गांधींचे पाय दाबले
चंद्रकांत खैरे म्हणाले की, नीतेश राणेंचे वडील काँग्रेसमध्ये गेले होते तेव्हा ते सोनिया गांधींचे पाय दाबत होते, तेव्हा सोनिया गांधी चांगल्या होत्या. नंतर सोनिया गांधींना शिव्या दिल्या.
आमदार बांगरांवर टीका
कळमनुरीच्या बाजार समिती निवडणुकीत 17 पैकी 17 जागा जर निवडून नाही आल्या, तर हा संतोष बांगर मिशा ठेवणार नाही, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केले होते. मात्र आता केवळ 5 जागा निवडून आल्यानंतर बांगर यांनी अर्धी मिशी काढवी असे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.