आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राजकारण:तुमच्यात मतभेद आहेत, हे आम्ही बोलायचं नाही का? चंद्रकांत पाटलांचा आघाडी सरकारला पुन्हा प्रश्न

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विरोधीपक्षाशी बोलायला या सरकारचा इगो आड येतो, चंद्रकांत पाटलांचा टोला

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लॉकडाऊनवरून राज्य सरकारमध्ये सुरू असलेल्या गोंधळावर ‘राज्यात नक्की काय सुरू आहे सरकार गोंधळात आहे’ अशी टीका केल्यानंतर, गुरुवारी थेट महाराष्ट्र विकास आघाडीतील सुंदोपसुंदी वर टीकास्त्र सोडले. तुमच्यात मतभेद आहेत हे आम्ही बोलायचं नाही का? असा प्रश्न करत ‘चौथीची पोरगी पण सांगेल की यांचे काही खरे नाही’, असा चिमटा काढला आहे. पाटील म्हणाले, हे सरकार मुंबईबाबत एकही धड निर्णय घेत नाही. केवळ मूर्खपणाचे निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे आजार राहिला बाजूला. मात्र मुंबईकर वैतागले आहेत. आम्ही काही बोललो की जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील लगेच बोलतात आम्हाला सत्तेची हाव लागलीय. तुमच्यात मतभेद आहेत हे आम्ही बोलायचे नाही का? चौथीची पोरगी पण सांगेल की यांचं काही खरं नाही. सरकारला नक्की काय करायचं आहे. लॉकडाऊन कडक करायचा आहे की अनलॉक करायचं आहे? एकीकडे अनलॉक सुरू करत आहोत सांगितले जात आहे. दुसरीकडे कडक निर्बंध लादले जात आहेत. नक्की काय चालू आहे हेच कळत नाही. लॉकडाऊनपेक्षा सरकारच्या अनलॉकमध्ये अधिक गोंधळ आहे. त्यामुळे नागरिकांनी नेमकं करायचं तरी काय, असा सवाल पाटील यांनी केला.

सरकारचा इगो आड येतो

या सरकारचा जनतेशी काहीही संबंध राहिला नाही. विरोधकांना विश्वासात घेतलं जात नाही. आम्ही सत्तेत असताना विरोधकांनाही विश्वासात घेत होतो. या सरकारने एकट्या देवेंद्र फडणवीस यांना जरी त्यांचे दिवसाचे दोन तास मागितले असते तरी प्रश्न निकाली निघाले असते. पण, या सरकारचा इगो आडवा येतो, दुसरे काय? असा टोलाही त्यांनी लगावला.      

0